Commando 3: शाळकरी मुलीचा स्कर्ट खेचण्याचे दृश्य पाहून भडकले नेटकरी, टीकेचा भडीमार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 14:46 IST2019-11-29T14:33:34+5:302019-11-29T14:46:29+5:30
Commando 3 Movie: बॉलिवूडचा अॅक्शन स्टार विद्युत जामवालचा ‘कमांडो ३’ रिलीज झाला आणि वादात सापडला.

Commando 3: शाळकरी मुलीचा स्कर्ट खेचण्याचे दृश्य पाहून भडकले नेटकरी, टीकेचा भडीमार
बॉलिवूडचा अॅक्शन स्टार विद्युत जामवालचा ‘कमांडो ३’ रिलीज झाला आणि वादात सापडला. होय, या चित्रपटातील एक सीन वादात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी अभिनेत्याच्या एण्ट्रीचा एक सीन यूट्यूबवर शेअर केला होता. या सीनमुळे सध्या वादंग माजले आहे. नेटक-यांनी चित्रपटाचा निर्माता आणि दिग्दर्शकांवर सडकून टीका केली आहे.
या पाच मिनिटाच्या व्हिडीओमध्ये पैलवान एका शाळकरी मुलीचा स्कर्ट खाली खेचत असल्याचे दृश्य दाखवण्यात आले आहे. पैलवान हे कृत्य करत असताना चित्रपटाचा हिरो विद्युतची एण्ट्री होते आणि पुढचा प्रकार थांबवतो. पण या सीनवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. केवळ इतकेच नाही तर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणीही पुढे रेटली आहे.
किमान लहान मुलांसोबतच्या अशा घटना तरी चित्रपटात दाखवू नका, अशा शब्दांत अनेक नेटक-यांनी संताप व्यक्त केला आहे. याशिवाय पैलवान असे अश्लिल कृत्य करत नाही, त्यांना बदनाम करू नका, असे असे म्हणत अनेकांनी या दृश्यावर टीका केली आहे.
‘कमांडो 3’हा चित्रपट ‘कमांडो’फ्रेन्चाइजीचा तीसरा चित्रपट आहे. या चित्रपटात विद्युत जामवाल व्यतिरिक्त अदा शर्मा, अंगिरा धर, गुलशन लीड रोलमध्ये आहेत. आदित्य धर या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला.
निर्माता म्हणतो, ही बोल्ड स्टेप
या वादाच्या पार्श्वभूमीवर, ‘कमांडो 3’चे निर्माते विपुल शाह यांनी हा सीन एक बोल्ड स्टेप असल्याचे म्हटले आहे. प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे, त्यांची उत्सुकता चाळवणे हेच शोधाची चावी आहे. आम्ही सुरुवातीलाच हा वादग्रस्त बोल्ड सीन दाखवला. तो पाहून प्रेक्षक संपूर्ण चित्रपट पाहतील, असा आमचा विश्वास आहे, असे शाह म्हणाले.