प्रियंकाच्या 'त्या' ड्रेसवर अजूनही सुरू आहे कमेंट्सचा भडिमार, वाचून हसून हसून व्हाल लोटपोट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 02:58 PM2020-01-30T14:58:25+5:302020-01-30T15:03:32+5:30
यावेळी तिचा अंदाज सेक्सी नसून फक्त बोल्ड होता. त्यामुळे साहजिकच देसी गर्लचा ‘प्लंजिंग नेकलाईन’ ड्रेसमधील हा बोल्ड अवतार भारतीय चाहत्यांच्या पचनी पडला नाही आणि त्यांनी प्रियंकांला ट्रोल करायला सुरुवात केली.
देसी गर्ल आणि पिग्गी चॉप्स प्रियंका चोप्रा या ना त्या कारणामुळे नेहमी चर्चेत असते. नुकत्याच पार पडलेल्या ग्रॅमी अवॉर्डसमध्ये प्रियंकाचा अंदाज अगदी पाहण्यासारखा होता. यावेळी प्रियंका असा काही बोल्ड ड्रेस घालून या अवार्ड्सच्या रेड कार्पेटवर उतरली की, सगळेच थक्क झाले होते. फोटोमध्ये प्रियंकाने ऑफ व्हाईट गाऊन परिधान केला आहे. हा गाऊन डीप फ्रंट ओपन गाऊन आहे. तिचा गाऊनचा गळा मानेपासून पोटाच्या बेंबीपर्यंत ओपन आहे.प्रियांकाने डिझायनर राल्फ रुसोने डिझाइन केलेला गाऊन परिधान केला होता.पण या ड्रेसचा फ्रंट नेट अधिक डीप असल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आलं होते. यावेळी तिचा अंदाज सेक्सी नसून फक्त बोल्ड होता. त्यामुळे साहजिकच देसी गर्लचा ‘प्लंजिंग नेकलाईन’ ड्रेसमधील हा बोल्ड अवतार भारतीय चाहत्यांच्या पचनी पडला नाही आणि त्यांनी प्रियंकांला ट्रोल करायला सुरुवात केली.
भारतीय सभ्येतेचे धडे देत अनेकांनी सोशल मीडियावर प्रियंकाला ट्रोल करण्यात आले. प्रियंकाच्या फॅन्सना तिचा हा अंदाज रुचलेलं नाही. अजूनही प्रियंकाचे ते फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असते.
Who wore it better?#priyankachopra#RanveerSinghpic.twitter.com/2kLYlun4Uu
— D.🥀 (@Confusedsoul22) January 25, 2020
यावर नेटीझन्सने आता फनी मिम्स करायला सुरूवात केली आहे. याआधीही प्रियंकाच्या फॅशन एक्सपेरिमेंटविषयी ट्रोल केले जाते. बहुदा आता या गोष्टींनी तिलाही काहीच फरक पडत नसल्याचे दिसते.
प्रियंकाला आता आणखीन एका हॉलिवूड सिनेमाची लॉटरी लागली आहे. 'मॅट्रिक्स' सिनेमाच्या चौथ्या भागात ती दिसू शकते. गेल्या काही दिवसांपासून प्रियंका व निर्मात्यांमध्ये या संदर्भात बातचीत सुरू आहे. आता ही चर्चा शेवटच्या टप्प्यात आली आहे. जर सर्व काही ठीक असेल तर लवकरच देसी गर्ल या प्रोजेक्टची घोषणा करण्याची शक्यता आहे. सध्या 'मॅट्रिक्स ४'मधील कलाकार ट्रेनिंग घेत आहे. लवकरच नॉर्थ कॅलिफोर्नियामध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे.
In 1993 a song released "Choli Ke Peeche Kya Hai"
— PUN_the_RICK (@PUN_the_RICK) January 27, 2020
And in 2020
"PRIYANKA released herself" 😅😅😅#DIGITAL_INDIA#bellyRingDress#PriyankaChoprapic.twitter.com/CdXLYbhtKR