कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी जतिन पंडित-राहुल जतिनच्या जोडीने तयार केले गाणं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 01:04 PM2020-05-13T13:04:28+5:302020-05-13T13:35:14+5:30
हे गाणं जगभरात सुरु असलेल्या महामारीबाबत जागरूकता आणण्याचा दिशेने तयार केले आहे.
जतिन पंडित आणि राहुल जतिन ही वडील व मुलाची जोडी पहिल्यांदाच एकत्रित ह्या निमिताने एकत्र काम करत आहेत. हृदयाला भिडणारी गाणी सर्व मनुष्यजातीला काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. ह्यातील शीर्षक गीत "प्रभू हम को शमा कर" हे गीत सध्या सर्व जगभरात थैमान घातलेल्या कोविड -19वर आधारित आहे. संगीत दिग्दर्शक जतिन पंडित यांनी लिहिलेले आणि राहुल यांनी तयार केलेले हे गाणं पिता-पुत्राच्या जोडीने मिळून गायले आहे.
या गाण्याबद्दल बोलताना जतिन पंडित म्हणाले, “माझ्या निर्माता मित्राच्या विनंतीवरून मी पहला नशा एक रोमँटिक ट्रॅक तयार करायला निघालो होतो. पण आज आपण ज्या परिस्थितीला तोंड देत आहोत त्यामुळे तास न तास बसूनही रोमँटिक गाण्याचा विचार करू शकलो नाही. माझ्या वाद्यांच्या समोर तिथेच बसून राहिलो, मी फक्त इतका विचार करू शकतो की संपूर्ण देश आणि जगात कोट्यवधी लोक कसे पीडित आहेत. हे जेव्हा मी गाणे लिहिले आणि गुणगुणत होतो तेव्हा राहूल आला ”.
“मी माझ्या वडिलांना हे गीत गुणगुंताना ऐकले आणि गीत वाचण्यासाठी मी त्यांची वही उचलली, गाणं गाण्यासाठी मी त्यांच्यात सामील झालो आणि मला तेव्हाच वाटले की हे प्रत्येकापर्यंत पोहोचले पाहिजे, हे गाणे रेकॉर्ड केलेच पाहिजे. गाणे गाताना मला शांततेची आणि संयमाची अचानक भावना जाणवली झाली. तसेच मला असे वाटले की प्रत्येकाला शांततेची आवश्यकता आहे. काही तासातच आम्ही रेकॉर्डिंग पूर्ण केले . मी गाण्याचा म्युझिक प्रोग्रामिंगचा भाग पूर्ण केला आणि तो अतिशय सुंदर झाला ”, असे गाणेबद्दल बोलताना राहुल म्हणाला.
राहुल जतिनने गेल्या वर्षी झी म्युझिकने प्रस्तुत केलेल्या 'आँखों के ईशारे' या सिंगल ट्रॅक मधून पदार्पण केले होते ह्यातुन लाखोंच्या पसंतीस आला होता.