Confirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 06:17 AM2018-04-24T06:17:22+5:302018-04-24T11:51:25+5:30

संजय दत्तच्या बायोपिकचे नाव काय असणार यावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी ते दत्त असे ठेवण्यात ...

Confirm: Lastly, the moment came when Sanjay Dutt's biopic was christened, 'The name' will be in the name of the audience! | Confirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला!

Confirm : अखेर तो क्षण आला संजय दत्तच्या बायोपिकचे झाले नामकरण, 'या' नावाने येणार रसिकांच्या भेटीला!

googlenewsNext
जय दत्तच्या बायोपिकचे नाव काय असणार यावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी ते दत्त असे ठेवण्यात आले होते. मात्र आता राजकुमार हिराणी यांनी या चित्रपटाचे नाव संजू असे ठेवण्यात आल्याचे स्पष्ट केले. अजूनपर्यंत या चित्रपटात नावाबाबत रोज नवे खुलासे होत होते मात्र आता संजू असणार असल्याचे कंफर्म झाले आहे.राजकुमार हिराणी यांनी डीएनएशी बोलताना चित्रपटाचे नाव 'संजू' असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी संजू हे नाव ठेवण्यात मागचे कारण देखील सांगितले, आम्ही अनेक नावांचा विचार केला होता. नाव ठरवताना एक गोष्ट आमच्या डोक्यात स्पष्ट होती ती म्हणजे ते न्यूट्रल असले पाहिजे. दत्त थोड हार्ड वाटत होते आणि नर्गिस या संजयला प्रेमाने संजू म्हणून हाक मारायच्या. आम्हाला वाटले की हे एकदम परफेक्ट आणि न्यूट्रलसुद्धा आहे.   

आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. आधी हा ट्रेलर आयपीएलच्या मॅच दरम्यान लाँच करण्यात येणार होता. मात्र त्यानंतर राजकुमार हिराणींनी तो सकाळ रिलीज करुन संध्याकाळी सामन्या दरम्यान दाखवण्याचा निर्णय घेतला. 

ALSO READ :  'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार

चित्रपटाच्या सेटवरून संजय दत्तच्या भूमिकेत असलेल्या रणबीर कपूरचे जेवढे फोटो समोर आले आहेत, त्या सर्व फोटोंमध्ये तो खूपच इम्प्रेसिंग दिसत आहे. कारण रणबीर संजूबाबाच्या लूकमध्ये हुबेहूब बघावयास मिळत असल्याने प्रेक्षक त्याला आतापासूनच संजूबाबा असे म्हणताना दिसत आहेत. हा चित्रपट यावर्षाच्या मोस्ट अवेटेड श्रेणीमध्ये असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता असेल यात शंका नाही. बायोपिकमध्ये रणबीर कपूर तीन वेगवेगळ्या अवतारात दिसणार आहे. हि भूमिका साकाराण्यासाठी रणबीर कपूरने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याला या चित्रपटाकडून अनेक अपेक्षा आहेत. चित्रपटाला विधू विनोद चोपडा प्रोड्यूस करीत आहेत.त्याव्यतिरिक्त विक्की कौशल, सोनम कपूर, दिया मिर्झा, मनीषा कोइराला आणि अनुष्का शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात महेश भट्ट आणि संजय दत्त हेदेखील गेस्ट अपियरेंस करताना बघावयास मिळणार आहे. चित्रपटाला विधू विनोद चोपडा प्रोड्यूस करीत आहेत. चित्रपट २९ जून २०१८ मध्ये प्रदर्शित केला जाईल. 

Web Title: Confirm: Lastly, the moment came when Sanjay Dutt's biopic was christened, 'The name' will be in the name of the audience!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.