Confirm...! गणितज्ज्ञ शंकुतला देवींवर येणार बायोपिक, त्यांची भूमिका साकारणार ही अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 08:14 PM2019-05-08T20:14:26+5:302019-05-08T20:14:52+5:30
प्रसिद्ध गणितज्ज्ञ शकुंतला देवी यांचा जीवन प्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे.
बॉलिवूडची उलाला गर्ल म्हणजेच अभिनेत्री विद्या बालनने रुपेरी पडद्यावर विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. विद्या नेहमी वेगवेगळ्या भूमिकांतून रसिकांसमोर आली आहे. आता पुन्हा एकदा ती एका नव्या भूमिकेत रसिकांना पहायला मिळणार आहे. ती आता प्रसिद्ध गणितज्ज्ञ शकुंतला देवींच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.
अभिनेत्री विद्या बालन हिने ट्विटरवर शंकुतला देवींची भूमिका साकारीत असल्याचे सांगितले. तसेच चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनीदेखील ट्विटरवर या चित्रपटाबद्दल सांगितलेेे आहे.
BIG DAY 🌞! Excited to play the role of Math Genius, #ShakuntalaDevi. @vikramix@anumenon1805 and I are thrilled to bring to life the true story of 'the human computer' - a small-town Indian girl, who took the world by storm! @Abundantia_Ent
— vidya balan (@vidya_balan) May 8, 2019
In theatres - Summer 2020 pic.twitter.com/LSCipkhwir
शकुंतला देवींच्या बायोपिकचे दिग्दर्शन अनु मेनन करणार असून विक्रम मल्होत्रा या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. हा सिनेमा २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शकुंतला देवी यांचा जन्म १९२९ मध्ये बंगळूरूमध्ये झाला. लहानपणीच त्यांच्या वडिलांना त्यांच्या बुद्धिमत्तेची प्रचिती आली. त्यांनी गणिताबरोबर ज्योतिषशास्त्रावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. १९८२ साली गिनीज बुक ऑफ रेकॅार्डने त्यांच्या कामाची दखल घेतली.
निर्मात्यांनी या बायोपिकबद्दल सांगितले की, “शकुंतला देवींसारख्या असामान्य व्यक्तिमत्वाच्या भूमिकेला विद्या बालनसारखी अष्टपैलू अभिनेत्रीच योग्य न्याय देऊ शकते.”
तर याबाबत अभिनेत्री विद्या बालन म्हणाली की, गणितज्ञ शकुंतला देवींची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारण्यास मी खूप उत्सुक आहे. मी आणि विक्रमने याआधी ‘कहानी’साठी एकत्र काम केले असून शकुंतला देवींचा जीवन प्रवास खूप प्रेरणादायी आहे. छोट्याशा गावातून आलेल्या या महिलेची गोष्ट चित्रपटातून दाखवणे आनंदाची बाब आहे.