असा टळला अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रामधला संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 07:17 AM2018-02-06T07:17:01+5:302018-02-06T12:47:01+5:30
सिद्धार्थ मल्होत्रा आणि अक्षय कुमार यांचा चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवरचा संघर्ष टाळला आहे. आधी पॅडमॅन आणि अय्यारी 9 फेब्रुवारील रिलीज ...
स द्धार्थ मल्होत्रा आणि अक्षय कुमार यांचा चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवरचा संघर्ष टाळला आहे. आधी पॅडमॅन आणि अय्यारी 9 फेब्रुवारील रिलीज होणार होते. मात्र ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी ही माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. दिग्दर्शक नीरज पांडे यांने अय्यारीची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. आता अय्यारी 16 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.
मिडेच्या रिपोर्टनुसार संरक्षण मंत्रालयाच्या अधिका-यांनी चित्रपटातील अनेक दृश्यांवर आक्षेप नोंदवला आहे आणि ते बदल करण्यास सांगितले आहेत. आता हे बदल कुठले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या समिक्षा समितीने संरक्षण मंत्रालयाच्या अधिका-यांसाठी ‘अय्यारी’चे स्पेशल स्क्रिनिंग ठेवले होते. चित्रपट पाहिल्यानंतर संरक्षण मंत्रालयाच्या अधिका-यांनी यात काही बदल सुचवल्याचे कळतेय.
अय्यारी हा एक अॅक्शन थ्रीलर चित्रपट आहे. यात सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज वाजपेयी लष्करी अधिका-याच्या भूमिकेत आहेत. यापूर्वी सेन्सॉर बोर्डानेही या चित्रपटाला पास न करता, तो समिक्षा समितीकडे पाठवला होता. आधी हा चित्रपट गत २६ जानेवारीला रिलीज होणार होता. पण २५ जानेवारीला ‘पद्मावत’ रिलीज झाल्याने ‘अय्यारी’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आता पॅडमनबरोबर हा चित्रपट रिलीज होणार होता मात्र आता तो संघर्ष टाळण्यासाठी तो 16 फेब्रुवारीला रिलीज करण्याचा निर्णय टीमने घेतला आहे.
‘अय्यारी’या अॅक्शनपटात सिद्धार्थ एकदम वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात मनोज वाजपेयी हा सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. सिद्धार्थ यात एक आर्मी आॅफिसर साकारणार आहे. यापूर्वी आलेले सिद्धार्थचे तिन्ही चित्रपट धडाधड आपटले होते. ‘बार बार देखो’, ‘ए जेंटलमॅन’, ‘इत्तेफाक’ हे सिद्धार्थचे तिन्ही चित्रपट बॉक्सआॅफिसवर कुठलीच कमाल दाखवू शकले नाहीत. त्यामुळे सिद्धार्थला ‘अय्यारी’कडून विशेष अपेक्षा आहेत.