जॅकलिनची काही चूक नाही, तिने फक्त..., ठगबाज सुकेश चंद्रशेखरने केला अभिनेत्रीचा बचाव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 02:36 PM2022-02-04T14:36:31+5:302022-02-04T14:42:00+5:30
Jacqueline Fernande : प्रायव्हेट फोटो लीक झाल्यामुळे नाराज आहे ठगबाज , सांगितलं जॅकलिनला महागड्या भेटवस्तू देण्यामागचं कारण
तब्बल 200 कोटी रूपयांच्या मनी लाँड्रिगचा आरोप असलेला आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबतच्या (Sukesh Chandrasekhar ) कथित संबंधांमुळे अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या काही दिवसांपासून जाम चर्चेत आहे. सुकेश व जॅकलिन रिलेशनशिपमध्ये होते, असा खुलासा झाल्यानंतर दोघांचे काही इंटिमेट प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर लीक झाले होते. सुकेशने जॅकलिनला महागड्या वस्तू भेट दिल्या होत्या. अगदी 56 लाखांचा घोडा, 36 लाखांच्या चार मांजरी अशा अनेक महागड्या भेटवस्तू देत त्याने तिच्यावर कोट्यावधी रूपये उधळले होते.आता यावर तुरुंगात बंद असलेल्या सुकेशची प्रतिक्रिया आली आहे. यात त्याने खासगी फोटो लीक झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. कृपा करून जॅकलिनला बदनाम करू नका. कारण तिच्यासाठी हे सगळं सोप नाही, असंही त्याने म्हटलं आहे.
आपल्या वकीलाच्या माध्यमातून सुकेशने मीडियासाठी एक पत्रक जारी केलं आहे. यात त्याने जॅकलिनचा बचाव केला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणाशी तिचा काहीही संबंध नाही, असं त्याने म्हटलं आहे.
तो म्हणतो,
ज्यापद्धतीने आमचे खासगी फोटो लीक झाले, ते अतिशय दु:खद व त्रासदायक आहे. मला गेल्या आठवड्यात याबद्दल कळलं. हे गोपनीयतेचे सरसकट उल्लंघन आहे. मी सर्वांना विनंती करतो की, जॅकलिनची चुकीची प्रतिमा दाखवू नका. कारण हे तिच्यासाठी ते सोप नाही. मी आधीच स्पष्ट केलंय की, जॅकलिनचा मनी लाँड्रिंग प्रकरणाशी काहीही संबंध नाही. जॅकलिन आणि मी रिलेशनशिपमध्ये होतो, हे मी आधीही सांगितलं आहे. आम्ही एकमेकांना डेट करत होतो आणि आमचं नातं कोणत्याही प्रकारे स्वार्थावर आधारित नव्हतं. आमच्या रिलेशनशिपमध्ये खूप प्रेम आणि आदर होता. आम्हाला एकमेकांकडून कोणतीही इच्छा किंवा अपेक्षा नव्हती. जॅकलिन किंवा तिच्या कुटुंबाला मी दिलेल्या महागड्या भेटवस्तू सामान्य गोष्टी आहेत. जे कोणीही त्याच्या प्रेमासाठी करेल. या गोष्टी इतक्या खासगी असताना त्यांना इतकं महत्त्व का दिलं जातेय हे मला कळत नाही. या भेटवस्तू माझ्या वैध कमाईतून दिलेल्या आहेत आणि हे लवकरच न्यायालयात सिद्ध होईल.
मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की या सगळ्या गोष्टीला चुकीच्या पद्धतीने घेऊ नका. कृपया जॅकलिनला प्रेम आणि पाठिंबा द्या कारण तिने काहीही चुकीचं केलेलं नाही. तिने फक्त कोणतीही अपेक्षा न बाळगता प्रेम केलंय.