-​ तर परिणाम भोगावे लागतील; रजनीकांत यांना मिळाली धमकी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2017 04:43 AM2017-05-14T04:43:40+5:302017-05-14T10:13:40+5:30

मेगास्टार रजनीकांंत यांचा ‘गॉडफादर’ हा आगामी सिनेमा अचानक चर्चेत आला आहे. हा चित्रपट कुख्यात डॉन हाजी मस्तानच्या आयुष्यावर बेतलेल्या ...

- The consequences will be born; Rajinikanth gets threatened !! | -​ तर परिणाम भोगावे लागतील; रजनीकांत यांना मिळाली धमकी!!

-​ तर परिणाम भोगावे लागतील; रजनीकांत यांना मिळाली धमकी!!

googlenewsNext
गास्टार रजनीकांंत यांचा ‘गॉडफादर’ हा आगामी सिनेमा अचानक चर्चेत आला आहे. हा चित्रपट कुख्यात डॉन हाजी मस्तानच्या आयुष्यावर बेतलेल्या आहे. नेमक्या याच गोष्टीमुळे हा चित्रपट काहीसा वांद्यात सापडण्याची चिन्हे आहेत. चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटावरून रजनीकांत यांना धमकी मिळाली आहे. कुख्यात डॉन हाजी मस्तानचा मानसपुत्र असलेल्या सुंदर शेखर याने रजनीकांत यांना धमकी दिली आहे. हाजी मस्तान यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवा, पण यात त्यांच्या प्रतिमेला धक्का लागला तर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा सुंदरने दिला आहे.


हाजी मस्तान

 तुम्ही हाजी मस्तानवर सिनेमा बनवत आहात. माझ्या वडीलांचा आदर वाढेल, तुमचाही आदर वाढेल असा सिनेमा तुम्ही बनवा. यासाठी मी तुम्हाला हवी ती मदत करायला तयार आहे. या सिनेमासाठी  मी रिअल स्टोरी देईल. पण, सिनेमा बनवताना हाजी मस्तान फक्त अंडरवर्ल्ड डॉन आणि स्मगलर आहे, असे दाखवू नका. कारण, हाजी मस्तानला न्यायालयाने दोषी मानले नव्हते. त्याने बनवलेला एक राजकीय पक्ष अजूनही अस्तित्वात आहे. त्यामुळे या सिनेमातून हाजी मस्तानची प्रतिमा डागाळू देऊ नये. असे झाल्यास त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. जर हाजी मस्तानला अंडरवर्ल्ड डॉन किंवा स्मगलर दाखवले गेलेच तर त्याचे वाईट परिणाम भोगण्यासही तयार राहा, असे सुंदरने धमकीच्या व्हिडिओत म्हटले आहे.

ALSO READ : ​‘2.0’मध्ये दिसणार रजनीकांत अन् अक्षय कुमारचे अनेक अवतार!

विशेष म्हणजे, हाजी मस्तानवर बनणारा रजनीकांत यांचा ‘गॉडफादर’ हा दुसरा सिनेमा आहे. याआधी काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ हा सिनेमाही हाजी मस्तानवर आधारित होता.

Web Title: - The consequences will be born; Rajinikanth gets threatened !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.