Corona Lock Down: असं कसं लॉक डाउन असूनही सलमानने भाच्याचा फार्महाऊसवर केला बर्थ डे सेलिब्रेट !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 04:26 PM2020-03-30T16:26:51+5:302020-03-30T16:35:50+5:30
जिथे आहात तिथेच राहण्याचे शासनाचे आदेश असूनही सलमानने इतक्या घाईत मुंबई का सोडली?
जगभरातील जवळपास सर्वच देश कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. रविवारी सकाळी 6 लाख 63 हजार 541 जणांना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली. तर 30, 873 लोकांचा मृत्यू झाला आहे. यादमरम्यान 1 लाख 42 हजार 175 रुग्ण ठीक झालेआहेत. युरोपात मृतांचा आकडा 20 हजारांपेक्षा अधिक झाला आहे. अशांमध्ये सर्वत्रच पूर्णपणे लॉक डाउन करण्यात आले आहे.
अनेक कलाकार लॉक डाउनमुळे घरात राहून घरातली कामं आणि छंद जोपासून वेळ घालवत आहेत. अशात बॉलिवूडचा दंबग सलमान खानने देखिल कोरोनाच्या भीतीपोटी पनवेल येथील फार्महाऊसवर राहतोय. सध्या सर्व खान कुटुंबिय याफार्महाऊसवर क्वॉरंटाईन टाईम एन्जॉय करत आहेत. जेव्हा सर्वत्र लॉक डाऊन जाहिर करण्यात आला त्याचवेळी सलमान लॉक डाउनचे नियम तोडत पनवेलला गेला.
जिथे आहात तिथेच राहण्याचे शासनाचे आदेश असूनही सलमानने इतक्या घाईत मुंबई का सोडली? तर त्याचे कारण आता समोर आले आहे. सलमान खानची बहिण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांचा मुलगा अहिलचा आज 4 वाढदिवस आहे. म्हणूनच सलमान खानचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या फार्म हाऊसवरच अहिलचा वाढदिवस साजरा करत आहेत. खरं तर सलमानला भाचा अहिलचा वाढदिवस सेलिब्रेट करायचा होता त्यामुळे तो संपूर्ण कुटुंबासह त्याने फार्महाऊस गाठले असावे असाही प्रश्न इथे उपस्थित होतो.
अहिल हा सलमानचा खूप लाडका आहे. नेहमी सलमान अहिलसोबत खेळताना पाहायला मिळतो. अहिलसाठी सलमान कोणत्याच गोष्टीची कमी ठेवत नाही. त्यामुळे दणक्यात अहिलचा वाढदिवस त्याने सेलिब्रेट केला. लॉकडाऊनमध्ये सुद्धा सलमानने त्याच्या आवडत्या भाच्याचा अशा प्रकारे मोठ्या थाटात वाढदिवस सेलिब्रेट केला त्यात कशाचीही कमतरता ठेवली नसल्याचे त्याचे फोटो पाहून तुमच्या लक्षात येईलच.
इतकेच नाहीतर सध्या स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी सारेच सोशळ डिस्टसिंगचे नियम पाळत आहेत. मात्र सलमानने हे फारसे काही मनावर घेतले नाही. कारण नुकतेच त्याच्या फार्महाऊसवर कुटुंबियांव्यतिरिक्तही काही लोकांचे येणे जाणे सुरू
असल्याचे निदर्शनास आले आहे. जॅकलिन फर्नांडिसने सलमानला भेटण्यासाठी फार्महाऊसवर गेली होती. जेव्हा सगळे कुटुंबिय एकत्र असताना सलमान खानचे वडील सलीम खान सध्या मुंबईतल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये एकटेच आहेत.