कोरोना लॉकडाऊन : कॅलिफोर्नियाहून परत आली ही अभिनेत्री, शेअर केला भयावह किस्सा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 14:09 IST2020-03-25T14:08:34+5:302020-03-25T14:09:07+5:30
एप्रिलपर्यंत कॅलिफोर्नियामधील 65% लोक या आजाराने बाधित होतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

कोरोना लॉकडाऊन : कॅलिफोर्नियाहून परत आली ही अभिनेत्री, शेअर केला भयावह किस्सा !
कोरोना व्हायरसमुळे देशातील सर्व लोक घरात बंद आहेत. लोक आपल्या बचावासाठी सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळत आहेत. ते स्वतःला स्वतःच्या घरात सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. याचदरम्यान सेलिब्रेटी घरात राहून आपला वेळ व्यतित करत आहेत. अभिनेत्री नितू चंद्रा काही दिवसांपूर्वी कॅलिफोर्नियाहून परत आली आहे. आदेशानुसार तिने देखील सेल्फ क्वॉरंटाईन करून घेतले आहे.
दरम्यान तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तिने कॅलिफोर्नियात कशाप्रकारे तेथील नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबतची माहिती सांगितली आहे. कुटुंबापासून दूर राहून तिथे जगणे फारच कठीण असल्याचे तिने सांगितले.
एप्रिलपर्यंत कॅलिफोर्नियामधील 65% लोक या आजाराने बाधित होतील असा अंदाज वर्तवला जात आहे. माझे आई-वडिल देखील खूप चिंतेत होते त्यामुळे सतत ते मला भारतात येण्यासाठी सांगत होते. जेव्हा मी घरी परतले तेव्हाच त्यांचा जीव भांड्यात पडला.
भारतात परतत असताना एअरपोर्टवर अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. लोक माझ्याकडे संशयाच्या नजरेने पाहत होते, मला ही कोरोनाची लागण तर नाही ना झाली या भीतीने माझ्याकडे पाहिले जात होते. प्रवेश करण्यापूर्वी माझी योग्य तपासणी झाली आणि नंतर मला एन्ट्री मिळाली. मी आनंदी आहे की मी सुरक्षितपणे परत आले आहे आणि कुटुंबासमवेत क्वालिटी वेळ घालवत आहे.'