कोरोनाशी लढणाऱ्या करिना कपूरची मुलांच्या आठवणीत झाली अशी अवस्था, म्हणाली- Covid I hate you

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 12:50 PM2021-12-18T12:50:56+5:302021-12-18T13:12:46+5:30

करिना कपूर खान( Kareena Kapoor Khan)ने अलीकडेच जेह आणि तैमूर अली खानसाठी एक भावनिक पोस्ट केली.

Corona positive kareena kapoor in quarantine missing her children shares post | कोरोनाशी लढणाऱ्या करिना कपूरची मुलांच्या आठवणीत झाली अशी अवस्था, म्हणाली- Covid I hate you

कोरोनाशी लढणाऱ्या करिना कपूरची मुलांच्या आठवणीत झाली अशी अवस्था, म्हणाली- Covid I hate you

googlenewsNext

करिना कपूर खान कोरोना पॉझिटिव्ह ( Kareena Kapoor Khan Corona Positive)  आहे आणि सध्या ती क्वारंटाईनमध्ये आहे. करिना कपूर कोरोनामधून रिकव्हर होत जरी असली तरी तिला  मुलांशिवाय राहणं कठीण झालं आहे. कोरोनाच्या काळात सैफ अली खानसोबतच्या प्रेमाविषयी बोलल्यानंतर तिने  अलीकडेच तिची दोन मुले जेह आणि तैमूर अली खानसाठी एक भावनिक पोस्ट केली. या आठवड्याच्या सुरुवातीला बेबोला कोविड-19 ची लागण झाली होती.

करिना कपूर क्वारंटाईनमध्ये खूप अस्वस्थ आहे. तिला तिची दोन मुले तैमूर आणि जेहची आठवण येत आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, 'कोविड आय हेट यू... मी माझ्या मुलांना मिस करते आहे. पण लवकरच या व्हायरसचा सामना करेन.' 10 महिन्यांचा जेह आणि पाच वर्षांचा तैमूर त्यांच्या वडील आणि  नैनीसोबत आहेत. दोन्ही मुलांची करीनाला आठवण येणं साहजिकचं आहे.

करिनाची एक मेड देखील कोविड-19 पॉझिटीव्ह आहे. 8 डिसेंबरला करिनाने अमृता अरोरा, सीमा खान आणि महीप कपूरसोबत चित्रपट निर्माता करण जोहरच्या घरी डिनर केले. या चौघींचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर  करण जोहरची दोनदा चाचणी झाली असून प्रत्येक वेळी त्याचा अहवाल निगेटिव्ह आला . मात्र  संजय कपूर (Sanjay Kapoor) व महिप कपूरची (Maheep Kapoor) लेक शनाया कपूर (Shanaya Kapoor) हिलाही कोरोनाची लागण झाली. शनायाने स्वत: ही माहिती दिली होती. 

Web Title: Corona positive kareena kapoor in quarantine missing her children shares post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.