Corona Virus: सिनेमा आणि मालिकांच्या शूटिंग बंद ठेवाव्यात की सुरू, उद्या होणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 01:59 PM2020-03-14T13:59:13+5:302020-03-14T14:01:12+5:30

काम कुठेही बंद न करता कोरोनापासून सुरक्षित राहून कशा रितीने कामाचे नियोजन करता येईल यासाठी उपयोजना आखल्या जाणार आहेत.

Corona virus argentine Joint Meeting Of Fwice Impa And Wifpa To Be Held On Sunday | Corona Virus: सिनेमा आणि मालिकांच्या शूटिंग बंद ठेवाव्यात की सुरू, उद्या होणार निर्णय

Corona Virus: सिनेमा आणि मालिकांच्या शूटिंग बंद ठेवाव्यात की सुरू, उद्या होणार निर्णय

googlenewsNext

कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून बुधवारी या साथीला महारोगराई घोषित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. आगामी दिवस आणि आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
कोरोना व्हायरसमुळे अनेक सिनेमाच्या पूर्वनियोजित प्रदर्शनाच्या तारखा अनिश्चित काळासाठी  पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर 'भूल भूलैया 2' सिनेमाचे लखनऊ येथे सुरू असेलेले शूटिंगही रद्द करण्यात आले आहेत. तर शासनाच्या आदेशानंतर थिएटरसुद्धा काल मध्यरात्रीपासून बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक सिनेमे आता पुन्हा नवीन तारखांनुसार प्रदर्शित केले जाणार आहेत. 


कोरोना व्हायरसचा वाढत धोका पाहता सिनेसृष्टीलामोठा फटका बसला असल्याचे चित्र सध्या आहे. कोरोना व्हायरसचा वाढत धोका पाहता मालिकांच्या बाबतीत आहे. मालिकांचे दिवस रात्र सुरू असणारे शूटिंगचे वेळापत्रकातही बदल करण्यात यावा का? अशा अनेक गोष्टींची फेडरेशन ऑफ वेस्टर्न  इंडिया सिने एम्प्लॉयज (एफडब्लूआईसीई) , इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर एसोसिएशन (इंपा) आणि वेस्टर्न इंडिया फिल्म प्रोड्युसर एसोसिएशन (डब्लूआईएफपीए) पदाधिका-यांची बैठक होणार आहे. काम कुठेही बंद न करता कोरोनापासून सुरक्षित राहून कशा रितीने कामाचे नियोजन करता येईल यासाठी उपयोजना आखल्या जाणार आहेत.

Web Title: Corona virus argentine Joint Meeting Of Fwice Impa And Wifpa To Be Held On Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.