Corona Virus: बॉलिवूड सेलिब्रिटींचा पुढाकार, हात जोडून करतायेत कळकळीने विनंती, व्हिडीओ Viral

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 03:01 PM2020-03-20T15:01:46+5:302020-03-20T15:02:19+5:30

या व्हिडीओच्या माध्यमातून कोरोना व्हायरसबाबत एक चांगला मेसेज दिल्यामुळे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओतील सर्वच कलाकारांचे आभार मानले आहेत.

Corona Virus: Bollywood Celebrity New short film on-corona virus-SRJ | Corona Virus: बॉलिवूड सेलिब्रिटींचा पुढाकार, हात जोडून करतायेत कळकळीने विनंती, व्हिडीओ Viral

Corona Virus: बॉलिवूड सेलिब्रिटींचा पुढाकार, हात जोडून करतायेत कळकळीने विनंती, व्हिडीओ Viral

googlenewsNext

भारतात या व्हायरसचे जवळपास 170 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 4 लोकांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. या व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पंतप्रधान मोदी यांनी यासाठी 22 मार्चला जनाता कर्फ्यूची हाक दिली आहे. कोरोना विषाणूची लागण रोखण्यासाठी सर्वच स्थरांवरून विविध उपाययोजयना सुचवल्या जात आहेत. आतापर्यंत अनेक सेलिब्रेटी पुढे येत कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जनजगागृती करत आहेत. अशातच रोहित शेट्टी दिग्दर्शित एक व्हिडीओ समोर आला आहे. यांत कोरोनाचे संक्रमण होण्यास रोखू शकतो तसेच आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे. तसचं या काळात कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या करु नयेत हेदेखील सांगितलं आहे. यासंदर्भातील हा व्हिडीओ आहे. 


या व्हिडीओच्या माध्यमातून कोरोना व्हायरसबाबत एक चांगला मेसेज दिल्यामुळे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओतील सर्वच कलाकारांचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असून आतापर्यंत हा आकडा 52 वर पोहोचला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  राज्यातील जनतेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला आहे. 'कोरोनाच्याविरोधात जागतिक युद्ध सुरू असून संपूर्ण जगाला घरात थांबण्याची वेळ आली आहे. पुढचे 15 दिवस काळजी घेण्याची गरज आहे' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
 

Web Title: Corona Virus: Bollywood Celebrity New short film on-corona virus-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.