Corona Lockdown: शाहरूखची लेक सुहाना खान लॉक डाऊनमध्ये करते या गोष्टी, पाहून तुम्हीही व्हाल भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 12:05 PM2020-03-28T12:05:52+5:302020-03-28T12:12:10+5:30
कोरोनाचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराला बसल्याचे चित्र आहे. न्यूयॉर्क हे जगातील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक मानले जाते. कोरोनाच्या संसर्गामुळे न्यूयॉर्क सिटीत हाहाकार उडाला आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग थांबतच नाहीय. या विषाणूने सामान्य लोकांपासून स्टार्सनाही भीतीच्या वातावरणात जगण्यास भाग पाडले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त संख्येत वाढ होत असल्याचे चित्र जगात पाहायला मिळत आहे. अनेकाना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. सर्वत्रच लाकडाउन असल्यामुळे अनेक कलाकार घरातच आपला क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहेत. अशातच स्टारकिडसदेखील त्यांच्या कुटंबासह वेगवेगळ्या एक्टीव्हटी करताना पाहायला मिळत आहेत. अशातच सर्वाधिक लोकप्रिय स्टारकिडपैकी सुहाना खान ही देखील नेहमीच चर्चेत असते.
सध्या ती अमेरिकेत अडकली आहे. लॉक डाउन असल्यामुळे ती देखील घरात बंद आहे. यामुळे सुहाना कमालीची दु:खी आहे. इतकी की, तिच्या डोळ्यांत अश्रू आहेत. जगभर थैमान घालणा-या कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी घोषीत करण्यात आली आहे. शाहरूखची 19 वर्षांची लेक सुहाना अमेरिकेच्या न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीत शिकतेय. कोरोनाची सुहानाने देखील खूप जास्त धास्ती घेतल्याचे पाहायला मिळते.
अशात ती तिच्या कुटुंबाला खूप मिस करते आहे. त्यामुळे तिच्या इन्स्टापेजवर नजर टाकल्यास तुम्हाला तिच्या कुटुंबाचे फोटो पाहायला मिळतील. म्हणजेच कुटुंबापासून लांब असल्यामुळे ती फक्त कुटुंबाचे फोटो पोस्ट करत आठवणीत रमल्याचे पाहायला मिळते. तसेच फिट राहण्यासाठी ती घरातच वर्कआऊट करत असल्याचेही पाहायला मिळते.
काही दिवसांपूर्वीच सुहानाने तिचे प्राइव्हेट इन्स्टा अकाऊंट पब्लिक केले होते. जवळपास 1 लाख 40 हजाराहून अधिक फॉलोअर्स असून तिचे प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात चाहत्यांना अधिक रस असतो. त्याच दरम्यान बॉलिवूडची बेबो करिना कपूर खान देखी इस्टावर एंट्री केली होती. मात्र करिनाला लोकप्रियतेच्या बाबतीत सुहाना खानने जोरदार टक्कर दिल्याचे पाहायला मिळाले. सर्वाधिक फॉलोर्स करिनापेक्षा सुहानाला मिळाले. म्हणून करिनापेक्षा सुहानाची अधिक लोकप्रियता असल्याचे पाहायला मिळते आहे.
कोरोनाचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराला बसल्याचे चित्र आहे. न्यूयॉर्क हे जगातील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक मानले जाते. कोरोनाच्या संसर्गामुळे न्यूयॉर्क सिटीत हाहाकार उडाला आहे. गेल्या २४ तासांत शहरात ८५ जणांचा मृत्यू झाला तर ४० हजारावर लोक बाधित आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. शहरात उपचारासाठी रुग्णालये मिळेनाशी झाली आहेत. सर्व रुग्णालये रुग्णांनी खचाखच भरली आहेत. त्यामुळे आता मोकळ्या जागेत उपचार करण्याची वेळ आली आहे.