Lockdown : घराबाहेर पडला सुनील ग्रोव्हर, असे पडले पोलिसांचे दंडुके!! पाहताच आवरणार नाही हसू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 12:02 PM2020-03-26T12:02:38+5:302020-03-26T12:12:46+5:30

हाहाहा...देवा शप्पथ घरी राहा...

corona virus lockdown sunil grover meme viral-ram | Lockdown : घराबाहेर पडला सुनील ग्रोव्हर, असे पडले पोलिसांचे दंडुके!! पाहताच आवरणार नाही हसू

Lockdown : घराबाहेर पडला सुनील ग्रोव्हर, असे पडले पोलिसांचे दंडुके!! पाहताच आवरणार नाही हसू

googlenewsNext
ठळक मुद्देआत्तापर्यत सुमारे दीड लाखांवर लोकांनी हे मीम शेअर केले आहे.

कोरोना व्हायरसचा वाढता धोका बघता, संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या लॉकडाऊनमध्ये अख्खा देश जणू ठप्प झाला आहे. लोक आपआपल्या घरात कैद आहेत. लॉकडाऊन एकप्रकारचा कर्फ्यूच समजा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केल्यानंतर विनाकारण घराबाहेर पडणा-यांना पोलिसांचे दंडुके पडत आहेत. यासंदर्भातील अनेक मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याचदरम्यान कॉमेडिशन सुनील ग्रोव्हरचे एक मीम तुफान व्हायरल होतेय.


खुद्द सुनील ग्रोव्हरने हे मीम त्याच्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत. ‘हाहाहा...देवा शप्पथ घरी राहा..., ’ असे हे मीम शेअर करताना त्याने लिहिले आहे.


आत्तापर्यत सुमारे दीड लाखांवर लोकांनी हे मीम शेअर केले आहे. यावर लोकांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लॉकडाऊनदरम्यान सरकार वारंवार लोकांना घरात राहण्याचे, विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत आहेत. पण काही लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. अशा लोकांना दंडुके लावण्याचे, प्रसंगी उठाबशा काढण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. या मीमवरून याची कल्पना तुम्हाला आलीच असेल.


तूर्तास लॉकडाऊनमुळे बॉलिवूडचे सर्वच स्टार्स घरात कैद आहेत. आपआपल्या घरात राहून ते वेगवेगळ्या कामात बिझी आहेत. अनेक स्टार्सनी लोकांनाही घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
तूर्तास देशातील कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. कोरोना बाधितांचा आकडा 600 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक असल्याने अख्ख्या राज्याची चिंता वाढली आहे.

Web Title: corona virus lockdown sunil grover meme viral-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.