CoronaVirus: सनी लिओनीच्या या नायकाने कोरोनाग्रस्तांसाठी दिले 36 रुमचे हॉटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 08:13 PM2020-04-08T20:13:32+5:302020-04-08T20:14:34+5:30
कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी या अभिनेत्याने दिला आहे मदतीचा हात
कोरोनाच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी सेलिब्रेटी त्यांना शक्य होईल ती मदत करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. नुकतेच शाहरूख खानने त्याच्या ऑफिसची जागा मुंबई महापालिकेला वापरायला देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच अभिनेता सोनू सूद याने मुंबईच्या जुहूस्थित आपले हॉटेल डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचा-यांसाठी खुले केले आहे. त्यानंतर आता अभिनेता सचिन जोशीने देखील 36 रुमचे हॉटेल महानगरपालिकेला वारण्यास द्यायचा निर्णय घेतला आहे. या हॉटेलचं नाव बीटल असून मुंबईतील पवई येथे आहे.
कोरोना व्हायरसच्या प्रकोपानंतर जागतिक शटडाउनमुळे सध्या सचिन जोशी दुबईत आहे. त्याने आयएएनएसशी बोलताना सांगितलं की, मुंबई खूप गर्दीचं ठिकाण असणारे शहर आहे. त्यामुळे तिथे पुरेसे हॉस्पिटल व बेड्स नाहीत. जेव्हा महानगर पालिकेने मदतीसाठी विचारले तेव्हा आम्ही मदत करण्याचे ठरविले. आम्ही बीएमसीच्या मदतीने आमचे हॉटेल क्वारंटाइन सुविधेसाठी दिले आहे. संपूर्ण इमारत व रूम सातत्याने सॅनिटाइज केले जात आहे आणि स्टाफदेखील गरजेचे सामान देखील अपूरे आहे.
आपले हॉटेल क्वारंटाइन सेंटर बनवण्यासोबतच त्याने बिग ब्रदर फाउंडेशनच्या माध्यमातून पालिकेच्या कामगारांना व पोलिसांना पौष्टीक पदार्थ उपलब्ध करून देत आहेत.
सचिन जोशीची पत्नी उर्वशी जोशीने देखील आयएएनएसशी बोलताना सांगितलं की, मला आनंद आहे की आम्ही आमचे हॉटेल बीटलला महापालिकेच्या मदतीसाठी दिले आहे. हा माझ्या नवऱ्याचा निर्णय आहे आणि माझा याला पाठिंबा आहे. याशिवाय रस्त्यावर अडकलेले लोक व गरजूंना जेवण देणार आहोत. आमची टीम मागील दोन आठवड्यांपासून सातत्याने काम करत आहे.