काय सांगता? ‘जलसा’त शिरले वघवाघूळ; अमिताभ बच्चन यांची उडाली भंबेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 11:52 AM2020-04-26T11:52:45+5:302020-04-26T11:54:30+5:30
अमिताभ यांचे हे ट्विट लगेच व्हायरल झाले. अनेकांनी त्यांच्या या ट्विटवर मजेशीर कमेंट्स केल्या.
चीनमधील वटवाघळांमुळे कोरोना विषाणू जगभर पसरला, असे मानले जात आहे. त्यामुळे वटवाघळांचे नाव ऐकले तरी धडकी भरावी, अशी सध्या स्थिती आहे. एखादे वटवाघुळ तुमच्या घरात शिरले तर काय? याची कल्पनाही न केलेली बरी. अशात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या घरात एक वटवाघूळ शिरले आणि खुद्द महानायकाची भंबेरी उडाली.
T 3510 - Ladies and gentlemen of the Jury .. news of the hour .. BREAKING NEWS .. would you believe it ..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 25, 2020
A Bat , a चमगादर has come into my room .. in Jalsa .. on the 3rd floor .. in my Den .. 😯😯
badi mushkil se use bahar nikala ..
Corona peecha chodh hi nahin raha !!!
होय, अमिताभ यांनी स्वत: ट्विटरवर याची माहिती दिली आहे. ‘देवियों और सज्जनों, या तासाची बातमी़ ब्रेकिंग न्यूज... एक वटवाघूळ जलसात तिस-या माळ्यावरील माझ्या खोलीत शिरले, यावर तुम्ही विश्वास ठेवाल? कसेबसे त्याला बाहेर काढले. कोरोना पिच्छाच सोडत नाहीये,’ असे ट्विट अमिताभ यांनी केले.
Sir Ramgopal verma ki aag dikha dete usko phir saare चमगादर Mumbai chhod k bhaag jaate 🤣
— Dubai se Hoon BC (@delhichatter) April 25, 2020
Rekha mam ne bheja hoga camera lagake
— Tweetera🐦 (@DoctorrSays) April 25, 2020
अमिताभ यांचे हे ट्विट लगेच व्हायरल झाले. अनेकांनी त्यांच्या या ट्विटवर कमेंट्स केल्या. यापैकी काही कमेंट चांगल्याच मजेशीर आहेत. ‘सर, ‘रामगोपाल वर्मा की आग’ दिखा देते उसको फिर सारे चमगादर मुंबई छोड के भाग जाते,’ अशी मजेशीर प्रतिक्रिया एका युजरने दिली. एकाने तर या वटवाघळाचा संबंध थेट रेखांशी जोडला. होय, रेखा मॅम ने भेजा होगा कॅमेरा लगा के, असे एका युजरने यावर लिहिले. यावरचे काही मीम्सही व्हायरल झालेत.
Wait. Wait. 🦇I am coming with you 🥰 pic.twitter.com/SveO7DevWe
— Rasha bachchan🌹 (@Ashabachchan) April 25, 2020
Bats are causing coronavirus, and here we can see Abhishek with a Bat. Iska matlab...... pic.twitter.com/tvphMH52Q1
— IRONY MAN (@karanku100) April 25, 2020
काहींनी मात्र या ट्विटवरून अमिताभ यांना सल्लाही दिला. वटवाघळांमुळे कोरोना पसरत नाही, तेव्हा असे ट्विट करून गैरसमज पसरवू नको, असे अनेकांनी त्यांना सांगितले.
एकंदर काय तर जलसामध्ये वटवाघूळ शिरल्याच्या निमित्ताने का होईना युजर्सचे काही वेळ मनोरंजन झाले.