Coronavirus : तोंड झाकावं लागल्यामुळे वैतागली सलमान खानची ही गर्लफ्रेंड, म्हणाली हे जबाबदार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 03:02 PM2020-03-19T15:02:15+5:302020-03-19T15:03:45+5:30
कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सलमानची गर्लफ्रेंड झाली त्रस्त
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान मांडलं आहे. आता सलमान खानची मैत्रिण युलिया वंतूर खूप दुःखी झाली आहे. युलियाने ट्विट करत या महामारीसाठी तिने माणसांनाच जबाबदार ठरविले आहे.
चीनच्या वुहान शहरातून कोरोना व्हायरसची लागण सुरू झाल्यानंतर आता हा व्हायरस जगातील कित्येक देशांमध्ये दाखल झाला आहे. काही देशांमध्ये परिस्थिती खूप गंभीर आहे. हळूहळू या व्हायरसने सगळीकडे उच्छाद मांडला आहे. भारत असा देश आहे जिथे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत सगळीकडे खबरदारी पाळली जात आहे आणि लोकांमध्ये जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यादरम्यान युलियाने ट्विट केले आहे.
युलियाने स्कार्फने झाकलेला फोटो शेअर करत तिने लिहिले की, आपण आपला चेहरा झाकण्यासाठी असहाय्य झालो आहे. कदाचित यामुळे कारण आपणच जगात ही परिस्थिती निर्माण केली आहे, ज्याची लाज वाटते. कोरोना व्हायरसच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी बरेच लोक मास्क लावत आहे. युलियाला यातून हेच सांगायचं आहे की जर आपण नियंत्रणात राहिलो असतो तर चेहरा झाकण्याची गरज पडलीच नसती.
युलिया रोमानियाची आहे आणि बऱ्याच कालावधीपासून ती सलमानच्या जवळच्या व्यक्तींमध्येदेखील तिचा समावेश आहे. युलियासोबत सलमान रिलेशनशीपमध्ये असल्याचं वृत्त समोर आले होते. मात्र या वृत्ताला दुजोरा न मिळाल्यामुळे या वृत्ताला पूर्णविराम लागला होता. युलिया सलमान खानसाठी कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे आहे आणि त्यांच्या कौटुंबिक सोहळे, सणांना ती सलमानसोबत पहायला मिळते.
युलिया बॉलिवूडमध्ये करियर बनवण्याच्या प्रयत्नात आहे. ती गायिका असून तिचा सिंगल अल्बम बाजारात उपलब्ध आहे. या अल्बममध्ये युलियासोबत मनीष पॉलदेखील आहे.