Corona Virus"सैफिनाने देखील दिला कोरोना ग्रस्तांसाठी मदतीचा हात, इतरांना देखील पुढे येण्याचे केले आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 10:24 AM2020-04-01T10:24:15+5:302020-04-01T10:25:23+5:30
करीनाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.
छोटे नवाब सैफ अली आणि बेगम करिना कपूर खान बॉलिूडमधील सगळ्यात जास्त ट्रेडिग कपल म्हणून ओळखले जातात. नेहमी त्यांच्या सिनेमा आणि खाजगी आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असतात. मात्र आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. सध्या सगळ्याच कलाकारांनी आपपल्या परीने इच्छेनुसार मदत करण्याचा निर्धार केला आहे. सध्या बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी पीएम केअर फंडमध्ये मदत करत समाजकार्यात खारीचा वाटा उचलला आहे. बॉलिवूडच नाही तर दाक्षिणात्य कलाकारांनी देखील मोठ्या संख्येने पुढे येत मदतीचा हात पुढे केला आहे. यात मराठी सिनेसृष्टीही मागे नाही. अनेकांनी निधी दान करत मदतीसाठी पुढे आले आहेत.
अशात बॉलिवूडमधील सलमान, अक्षय इ. नावे सर्वाधिक चर्चेत असताना नवाब सैफ आणि करिना देखील पुढे आले आहेत. सैफिनाने पीएम केअर फंडमध्ये नाही तर यूनिसेफ (UNICEF), गिव्ह इंडिया (GIVE INDIA) आणि द इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन वॅल्यूजला (IAHV) या संस्थांना मदतनिधी दिला आहे. खुद्द करीनाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. तसेच इतरांनी देखील पुढे येत मदत करण्याचे आवाहन केले आहे. काही दिवसांपूर्वीच सैफ आणि अमृता सिंहची लेक सारा खानने देखील मदत निधी दिला आहे.
सैफिना प्रमाणेच प्रियांक आणि निक जोनासने देखील कोरोनाव्हायरसच्या संकटाशी झगडणा-या जगाला मदत करण्यासाठी पुढे आले होते. त्यांनी देखील पंतप्रधान केअर फंडसह युनिसेफ आणि इतर संस्थाना मदत निधी दिला आहे. कोरोनाव्हायरसमुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे आणि येथे मृत्यूची संख्या दररोज वाढत आहे.त्यामुळे परिस्तीत चिंतेची असली तरी या संकटातून बाहेर पडण्यासाठी सा-यांनीच पुढाकार घेण्याचे गरजेचे आहे. त्यामुळे जसे जमेल तसे बेघर लोक, डॉक्टर, भुकेलेली मुले आणि संगीत आणि एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीतील गरजू लोकांना मदत करण्साठी आवाहन केले आहे. आपले योगदान देण्यास तुम्हाला प्रोत्साहित करू. कुठलीही रक्कम लहान नसते मग तो एक डॉलर का असेना असे म्हणत तिने इतरांनाही मदत करण्याचे आवाहन केले आहे.