Coronavirus: कोरोना पॉझिटिव्ह कनिका कपूरच्या मित्राचा लखनऊ पोलीस घेताहेत शोध, हे आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 04:52 PM2020-03-23T16:52:29+5:302020-03-23T16:53:14+5:30
कनिका कपूरसोबत पार्टीत उपस्थित असलेला मित्र आहे गायब, पोलीस घेत आहेत शोध
बेबी डॉल गाण्यामुळे लोकप्रिय झालेली गायिका कनिका कपूरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यापासून ती डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. लखनऊच्या हॉस्पिटलमध्ये कनिकाला आइसोलेशनमध्ये ठेवले आहे. कनिका लंडनवरून परतल्यानंतर तिने पार्टी
अटेंड केली होती. या पार्टीला उपस्थित असलेल्या 34 लोकांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मात्र पोलीस याप्रकरणी कनिकाच्या एका मित्राचा शोध घेत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लखनऊ पोलीस मुंबई स्थित उद्योजक ओजस देसाई याचा शोध घेत आहेत. ओजस 16 मार्चला ताज होटलमध्ये झालेल्या पार्टीत कनिका कपूरसोबत होती. या पार्टीत उपस्थित असलेल्या 260 लोकांना पोलिसांनी ट्रॅक केले आहे. मात्र ओजस देसाईसोबत आतापर्यंत पोलिसांचे कोणतेही कॉन्टॅक्ट झालेलं नाही. कनिकाचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आल्यानंतर लखनऊ एडमिनिस्ट्रेशनने हॉटेल ताज बंद केले आहे.
लखनऊमधील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इंस्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सचे डायरेक्टर आर धीमन यांच्यानुसार कनिका उपाचारादरम्यान नखरे करत आहे. ती आइसोलेशन वॉर्डमध्ये स्टारसारखी वर्तणूक करत आहे. उलट तिला चांगल्या सुविधादेखील दिल्या जात आहे.
एका मुलाखतीत आर के धीमन यांनी सांगितले की, कनिकाला एका हॉस्पिटलच्या माहितीनुसार जेवढ्या सुविधा दिल्या जाऊ शकतात. आम्ही देत आहोत. तिला आम्हाला एका रुग्णाप्रमाणे सहकार्य करण्याची गरज आहे. ती स्टारसारखी नखरे दाखवत आहे. आम्ही तिला हॉस्पिटलच्या किचनमधून ग्लुटेन फ्री डाएट देत आहोत. तिने आम्हाला साथ दिली पाहिजे. तिला सर्वात आधी एका रुग्णासारखे वागले पाहिजे.
दुसरीकडे हॉस्पिटल प्रशासनाला ही भीती आहे की कनिका कपूर तिथून पळून जाण्यासाठी प्रयत्न करेल आणि दुसऱ्यांकडे व्हायरस पसरवेल. त्यासाठी हॉस्पिटल प्रशासनाने तिच्यासाठी एक्स्ट्रा सुरक्षारक्षक तैनात केला आहे.