CoronaVirus: मजूरांसाठी करण जोहर बनला देवदूत, पीएम केअर्स फंडसोबत या ठिकाणी दिले योगदान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 04:48 PM2020-04-18T16:48:35+5:302020-04-18T16:49:11+5:30
कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी करण जोहर पुढे सरसावला आहे.
कोरोना व्हायरसने देशभरात थैमान मांडले आहे. त्यामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे आणि सर्व व्यवसाय, ऑफिसेस सगळे काम ठप्प आहे. अशात दैनंदिन वेतनावर काम करणाऱ्या मजुरांना आर्थिक तंगी व दोन वेळच्या जेवणाचे हाल होत आहेत. त्यांच्या मदतीसाठी करण जोहरने पुढाकार घेतला आहे.
करण जोहरने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे की, त्यात त्याने सांगितले की, कसे तो व त्याचे धर्मा प्रोडक्शन लॉकडाउनमुळे प्रभावित झालेल्या दैनंदिन वेतनावर काम करणाऱ्या मजुरांची मदत करत आहे. करणने पोस्टमध्ये सांगितले की, धर्मा पीएम केअर्स फंड, मुख्यमंत्री सहाय्यक निधी, एनजीओ गुंज, गिव फंड राइजर्स, फिडिंग इंडिया व द आर्ट ऑफ लिविंग, आईएएचवी आणि प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाला निधी देत आहे.
करणने व्हि़डिओ पोस्ट शेअर करून लिहिले की, आपण सगळे एकत्र आहोत आणि आपल्याला एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. हे आपलं कर्तव्य आहे की, या कठीण समयी एकत्र येऊन मदत केली पाहिजे. हेच कारण आहे की लॉकडाउनच्या या कठीण वेळी गरजवंतांच्या मदतीसाठी धर्मा कुटुंब पुढे आले आहे.
कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटींनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. त्या यादीत आता करण जोहरच्या नावाचीदेखील भर पडली आहे.