Coronavirus: कृति सेनॉन व राजकुमार रावचा कोरोनाकडे कानाडोळा, सुरू केलं आगामी सिनेमाचं शूटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 05:53 PM2020-03-18T17:53:27+5:302020-03-18T17:54:10+5:30
कृति सेनॉनने कोरोनाकडे कानाडोळा करीत आगामी चित्रपटाचं शूटिंग राजकुमार रावसोबत सुरू केले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनॉनने नुकतेच आगामी चित्रपट मिमीचं शूटिंग पूर्ण केलं आहे. यावेळी जगात कोरोना व्हायरसच्या भीतीचं सावट पसरले आहे. त्यामुळे बॉलिवूड व टेलिव्हिजन इंडस्ट्रीने शूटिंग थांबवलं आहे. तर चित्रपटाच्या रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र या सगळ्या गोष्टींकडे कृति सेनॉनने कानाडोळा करीत मिमीनंतर आगामी चित्रपटाचं शूटिंग राजकुमार रावसोबत सुरू केले आहे. कृति व राजकुमार यांची जोडी रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
अभिषेक जैनच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या चित्रपटात कृति सेनॉन व राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचं जास्त शूटिंग मुंबईत होणार आहे. दिनेश विजानच्या मॅडडॉक फिल्म्स आणि जिओ स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटात कृति व राजकुमार यांच्याशिवाय डिंपल कपाडिया व परेश रावल हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची जास्त स्क्रीप्ट तयार आहे. या चित्रपटाच्या टायटलबद्दल अद्याप कोणतीही ऑफिशिएल अनाउंसमेंट झाली नाही आहे.
कृति सेनॉन व राजकुमार राव ही जोडी यापूर्वी 2017 साली सुपरहिट चित्रपट बरेली की बर्फीमध्ये दिसले आहेत. या चित्रपटातील दोघांचे काम प्रेक्षकांना खूप भावले आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत आयुषमान खुराणा मुख्य भूमिकेत होता.
कृति सेनॉनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर कृति सेनॉनने मिमी चित्रपटासाठी 15 किलो वजन वाढविले आहे.या सिनेमात तिच्यासोबत पंकज त्रिपाठी व सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
कृति शेवटची अर्जुन कपूरसोबत पानिपतमध्ये दिसली होती. या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतूक झाले आहे.