जुलैमध्ये शूटींग सुरु होण्याची शक्यता, मात्र पाळावे लागणार हे 8 कठोर नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 04:06 PM2020-05-05T16:06:58+5:302020-05-05T16:08:16+5:30

येत्या जुलैपासून शूटींगची परवानगी मिळू शकेल, अशी आशा मनोरंजन विश्वाला वाटतेय. 

coronavirus lockdown film shooting to be start soon with thses news rules-ram | जुलैमध्ये शूटींग सुरु होण्याची शक्यता, मात्र पाळावे लागणार हे 8 कठोर नियम

जुलैमध्ये शूटींग सुरु होण्याची शक्यता, मात्र पाळावे लागणार हे 8 कठोर नियम

googlenewsNext

लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु होताच सरकारने काही प्रमाणात शिथिलता देणे सुरु केले आणि याचसोबत मनोरंजन उद्योगानेही शूटींग पूर्ववत सुरु करण्याच्या दिशेने तयारी सुरु केली. लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर मनोरंजन उद्योग ठप्प पडला. नव्या मालिकांचे, सिनेमांचे शूटींग थांबले, आगामी सिनेमांचे प्रदर्शनही रोखले गेले़.  मात्र आता लॉकडाऊनमध्ये आलेली शिथिलता बघता, मनोरंजन उद्योगाच्या जीवात जीव आला आहे, केवळ इतकेच नाही तर येत्या दिवसांत शूटींग सुरु झाल्यानंतर शूटींगची योजनाही तयार झाली आहे. येत्या जुलैपासून शूटींगची परवानगी मिळू शकेल, अशी आशा मनोरंजन विश्वाला वाटतेय. ही  परवानगी मिळालीच तर अनेक निर्बंधासह शूटींग सुरु होणार आहे.

 सोमवारी सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन (सिंटा) आणि फेडरेशन आॅफ वेस्टर्न इंडिया सिनेएम्प्लॉइजच्या पदाधिका-यांची बैठक पार पडली. या बैठकीत येत्या जुलैपासून शूटींगची परवानगी मिळेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. शिवाय या पार्श्वभूमीवर सेटवरच्या संभाव्य बदलांवरही चर्चा झाली. काही सुरक्षा निर्देशांचे पालन करून चित्रपट व मालिकांचे शूटींग सुरु करता येईल, यावर या बैठकीत एकमत झाले. अर्थात अधिकृतपणे याबद्दलची घोषणा करण्यात आलेली नाही. सिंटाचे सचिव अमित बहल यांनी सांगितल्यानुसार, पहिल्या बैठकीत केवळ सूचना केल्या गेल्या. अद्याप काहीही ठरलेले नाही. राज्य सरकारने परवानगी दिल्याशिवाय  काहीही निर्णय घेता नाही, मराठी चित्रपट महामंडळ, मराठी नाट्यपरिषद यासर्वांसोबत चर्चा करूनच काही गोष्टी ठरवल्या जातील.


 

असे असू शकतात नवे निर्बंध

लॉकडाऊननंतर शूटींग सुरु झाल्यास सेटवर आलेल्या प्रत्येकाची स्वॅब टेस्ट होईल. 
सेटवर सॅनिटायझर, मास्क उपलब्ध करून देणे बंधनकारक असेल.
प्रत्येक सेटवर एक डॉक्टर आणि नर्सचे पथक तैनात असेल.
निर्मात्याने 12 तासांच्या शिफ्टमध्ये सेटवरच्या प्रत्येकाला चार मास्क पुरवावेत.
अ‍ॅक्टर्सनी आपले मेकअप घरूनच करून यावे.
चित्रपट व मालिकांच्या लीड हिरो वा हिरोईनची अख्खी टीम सेटवर नेण्याची परवानगी नसेल. त्यांचा केवळ एकच माणूस सेटवर असेल. 
शूटींग सुरु झाल्यानंतर तीन महिन्यांपर्यंत 60 वर्षांवरील कुठलाही कामगार व कर्मचारी सेटवर काम करणार नाही.
प्रत्येकाचे थर्मल स्क्रिनिंग बंधनकारक असेल.

Web Title: coronavirus lockdown film shooting to be start soon with thses news rules-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.