का आलीय कतरिना कैफ आणि कार्तिक आर्यनवर भांडी घासण्याची वेळ? पाहा हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 09:58 AM2020-03-24T09:58:47+5:302020-03-24T10:04:28+5:30

कतरिना आणि कार्तिक आर्यनने त्यांच्या सोशल मीडियावर भांडी घासतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Coronavirus Pandemic- Katrina Kaif to Kartik Aaryan turned house help amid the self-quarantine period PSC | का आलीय कतरिना कैफ आणि कार्तिक आर्यनवर भांडी घासण्याची वेळ? पाहा हा व्हिडिओ

का आलीय कतरिना कैफ आणि कार्तिक आर्यनवर भांडी घासण्याची वेळ? पाहा हा व्हिडिओ

googlenewsNext
ठळक मुद्देकतरिना कैफ, कार्तिक आर्यन यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत कतरिना आणि आर्यन चक्क घरची भांडी घासताना दिसत आहेत.

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून शाळा-कॉलेज बंद केले जात आहेत. तसेच सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही काही काळ थांबवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर भारतातील अनेक राज्यात मॉल्स, थिएटर बंद करण्यात आले आहेत. ऑफिसेसमध्ये देखील अनेक ठिकाणी वर्क फ्रॉम होम देण्यात आले आहे. लोकांनी घरातून कमीत कमी बाहेर पडावे. गरज असेल तरच सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय वापरावा असे सरकार गेल्या काही दिवसांपासून मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगत आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येकजण आपल्यापरिने प्रयत्न करत आहे. घरकाम करणाऱ्या बायकांना देखील सगळ्यांनी सुट्ट्या दिल्या असून प्रत्येकजण आपल्या घरातील काम स्वतःच करत आहे. केवळ सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटी देखील आपली घरची कामं स्वतःच करताना दिसत आहेत. कतरिना कैफ, कार्तिक आर्यन यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत कतरिना आणि आर्यन चक्क घरची भांडी घासताना दिसत आहेत. कतरिना भांडी कशाप्रकारे घासायची याचे लोकांना धडे देताना देखील दिसत आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत ती सांगत आहे की, सगळेजण आता आपापल्या घरी असून घरकाम करायला कोणीच नाहीये. म्हणून  मी आणि माझी बहीण इजाबेलने घरातील भांडी स्वतःच घासायची ठरवली.

कार्तिक आर्यनने भांडी घासतानाचा व्हिडिओ पोस्ट केला असून त्यासोबत कहानी घर घर की असे कॅप्शन दिले आहे.

कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून या साथीला महारोगराई घोषित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. आगामी दिवस आणि आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Coronavirus Pandemic- Katrina Kaif to Kartik Aaryan turned house help amid the self-quarantine period PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.