CoronaVirus: देशाच्या मदतीला पुढे सरसावले बाजीराव-मस्तानी, म्हणाले- संकटकाळी आपण सगळे आहोत एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 12:08 PM2020-04-04T12:08:19+5:302020-04-04T12:08:54+5:30

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी बॉलिवूडचे बाजीराव मस्तानी म्हणजे रणवीर दीपिकाही पुढे सरसावले आहेत.

CoronaVirus: Ranveer Singh and Deepika Padukone contributed in PM Care Fund TJL | CoronaVirus: देशाच्या मदतीला पुढे सरसावले बाजीराव-मस्तानी, म्हणाले- संकटकाळी आपण सगळे आहोत एकत्र

CoronaVirus: देशाच्या मदतीला पुढे सरसावले बाजीराव-मस्तानी, म्हणाले- संकटकाळी आपण सगळे आहोत एकत्र

googlenewsNext

 

संपूर्ण देशात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन जाहीर केले आहे. या वाढत्या प्रकोपासाठी सरकारच्या मदतीसाठी बरेच कलाकार पुढे सरसावले आहेत. यामध्ये बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांनी पुढाकार घेतला आहे. या यादीत आता बॉलिवूडचे बाजीराव मस्तानी म्हणजेच अभिनेता रणवीर सिंगदीपिका पादुकोण यांच्याही नावाचा समावेश झाला आहे. 

रणवीर सिंगने इंस्टाग्रामवर तो आणि दीपिका पीएम केअर फंड देत असल्याचं सांगितलं आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिलं की, सध्याच्या परिस्थितीत छोट्यांहून छोटे प्रयत्न महत्त्वाचा आहे. आम्ही पूर्ण नम्रतेने पीएम केअर फंडमध्ये योगदान देण्याचा संकल्प केला आहे आणि आम्हाला आशा आहे की तुम्हीदेखील तुमचे योगदान द्याल. या संकटकाळी आपण सगळे एकत्र आहोत. जय हिंद. दीपिका आणि रणवीर.

देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४९० वर पोहचला आहे. २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाचं संकट वाढताना दिसत आहे.

Web Title: CoronaVirus: Ranveer Singh and Deepika Padukone contributed in PM Care Fund TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.