CoronaVirus: फराह खानच्या 12 वर्षांच्या मुलीची कामगिरी ऐकून तुम्हाला वाटेल तिचे कौतूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 11:19 AM2020-04-14T11:19:26+5:302020-04-14T11:20:08+5:30

फराह खानच्या मुलीच्या कामगिरीचे सेलिब्रेटींसोबत सगळेच करताहेत प्रशंसा

CoronaVirus: You would appreciate hearing Farah Khan's 12-year-old daughter perform TJL | CoronaVirus: फराह खानच्या 12 वर्षांच्या मुलीची कामगिरी ऐकून तुम्हाला वाटेल तिचे कौतूक

CoronaVirus: फराह खानच्या 12 वर्षांच्या मुलीची कामगिरी ऐकून तुम्हाला वाटेल तिचे कौतूक

googlenewsNext

संपूर्ण देश सध्या कोरोना व्हायरसविरूद्ध लढाई लढत आहेत. प्रत्येक जण या लढाईत उतरले असताना समाजातील काही दानशूरांनी सरकारला मदतीचा हात देऊ केला आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी सरकारला आपआपल्या परीने मदतदेखील केली आहे. या दानशूरांच्या यादीत एका छोट्या मुलीच्या नावाचीदेखील भर पडली आहे. प्रसिद्ध कोरियोग्राफर व दिग्दर्शिका फराह खान हिच्या १२ वर्षीची मुलगी आन्या हिने स्वकमाईचे ७० हजार रुपये देणगी म्हणून दिले आहेत. कोरोनामुळे भटक्या प्राण्यांच्या मदतीसाठी आन्याने ही रक्कम दिली आहे. तिच्या या कामाचे सगळेच खूप कौतुक करत आहेत. 

फराह खानने आन्याचा व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे. फराहने हा व्हिडिओ शेअर करून लिहिले की, "माझ्या १२ वर्षाच्या आन्याने गेल्या पाच दिवसात पाळीव प्राण्यांची चित्र रेखाटून आणि प्रत्येक चित्र एक हजार रुपयांना विकून ७० हजार रुपये जमा केले आहेत. हे पैसे भटक्या आणि गरजू प्राण्यांसाठी वापरले जाणार आहेत. त्याचप्रमाणे ही चित्रं ज्यांनी विकत घेतली त्या सर्वांचे आभार."


आन्याच्या या कामाचे बॉलिवूडच्या मंडळीने कौतुक केलं आहे. बर्‍याच सेलिब्रिटीनी ट्विटद्वारे प्रोत्साहन दिले आहे आणि तिच्या कामाचे कौतुक केले आहे.

बॉलिवूडच्या कलाकारांनी देखील खूप मदत केली आहे. अनुष्का शर्मा, अक्षय कुमार, प्रभास, अल्लू अर्जुन, पवनकल्याण, कपिल शर्मा, वरुण धवन, करण जोहर, आयुषमान खुराना, गुरु रंधावा आणि टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांनीही पीएम केअर फंडला निधी दिला आहे.

Web Title: CoronaVirus: You would appreciate hearing Farah Khan's 12-year-old daughter perform TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.