वयाच्या १३ व्या वर्षापासून कतरिनाची पूजा करतोय चाहता, आता पत्नीही देते साथ; कोण आहे हा?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 11:24 AM2024-07-17T11:24:10+5:302024-07-17T11:25:01+5:30

कतरिना त्यांना भेटायला यावी अशी त्यांची इच्छा आहे.

couple from Hariyana worships actress Katrina Kaif on her birthday man doing this ritual since 13 years old | वयाच्या १३ व्या वर्षापासून कतरिनाची पूजा करतोय चाहता, आता पत्नीही देते साथ; कोण आहे हा?

वयाच्या १३ व्या वर्षापासून कतरिनाची पूजा करतोय चाहता, आता पत्नीही देते साथ; कोण आहे हा?

भारतात सिनेप्रेमी, कलाकारांचे चाहते खूप आहेत. आवडत्या कलाकारावरचं प्रेम दाखवण्यासाठी ते कोणतीही पातळी गाठू शकतात. साऊथ अभिनेते रजनीकांत यांचं तर चाहत्यांनी मंदिरही बांधलंय.  अभिनेत्री कतरिना कैफचाही (Katrina Kaif) असाच एक वेडा चाहता आहे जो वयाच्या 13-14 वर्षापासून कतरिनाची तिच्या वाढदिवसाला पूजा करतो. आता तर त्याची पत्नीही यात सहभागी झाली आहे. कोण आहे हा चाहता आणि कुठे राहतो वाचा.

हरियाणातील चरखी दादरी जिल्ह्यातील ढाणी फोगाट गावात राहणारा हा आहे कर्मबीर उर्फ बंटू. तर त्याच्या पत्नीचं नाव संतोष आहे. ११ वर्षांपासून हे दोघं कतरिना कैफची देवीसारखी पूजा करतात. कतरिनाच्या वाढदिवसाला केक कट करतात. गावात लाडूचं वाटपही करतात. कतरिना त्यांना भेटायला यावी अशी त्यांची इच्छा आहे. बंटू म्हणतो, " मी १३-१४ वर्षांचा होतो तेव्हापासून कतरिनाचा वाढदिवस साजरा करतो. लग्नानंतर माझी पत्नीही हेच करते. कतरिनाला भेटण्याची आमची खूप इच्छा आहे. आम्हाला आशा आहे की एक ना एक दिवस ती आम्हाला नक्की भेटेल."

बंटूची पत्नी संतोष म्हणाली, "आज कतरिना 41 वर्षांची झाली आहे. यानिमित्त मी आणि माझ्या पतीने तिचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला. माझी कतरिनाला हात जोडून विनंती आहे की तिने आम्हाला भेटायला यावं. माझ्या पतीप्रमाणेच मी सुद्धा तिला खूप मानते."

आपल्या आवडत्या अभिनेत्रीवरचं प्रेम दाखवण्याची या चाहत्यांची पद्धत भन्नाटच आहे. दरवर्षी कतरिनाच्या वाढदिवसाला हे कपल चर्चेत असतं. कतरिनाच्या 'राजनीति' मधल्या लूकचा फोटो त्यांनी घरी लावला आहे ज्याची ते पूजा करतात. 

Web Title: couple from Hariyana worships actress Katrina Kaif on her birthday man doing this ritual since 13 years old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.