All Is Well रणधीर कपूर यांच्या तब्येतीत सुधारणा, ICU मधून नॉर्मल वॉडात झाले शिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 02:52 PM2021-05-03T14:52:25+5:302021-05-03T14:57:15+5:30
आता मी लवकरच घरी जाणार आहे.' माझी ऑक्सिजनची पातळी सामान्य असून मला श्वास घेण्यास त्रास होत नाहीये. पण आता मी पूर्णपणे ठीक आहे," असे रणधीर कपूर म्हणाले.
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. 29 एप्रिल रोजी त्यांचा कोविड 19 टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. 74 वर्षीय रणधीर कपूर यांना सुरुवातीला रुग्णालयाच्या नॉर्मल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. तब्येत बिघडल्यामुळे त्यांना तातडीनेआयसीयूमध्येही हवलण्यात आले होते. समोर आलेल्या माहितीनुसार रणधीर कपूर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. आयसीयूमधून त्यांना आता नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. आता मी लवकरच घरी जाणार आहे.' माझी ऑक्सिजनची पातळी सामान्य असून मला श्वास घेण्यास त्रास होत नाहीये. मला ताप आला होता. पण आता मी पूर्णपणे ठीक आहे," असे रणधीर म्हणाले.
कोरोनाची लागण झाल्यानंतर रणधीर कपूर यांनी सांगिते होते की,मला कोरोना कसा झाला, माहित नाही़. मी स्वत: हैराण आहे. माझ्या पाच स्टाफ मेंबर्सलाही कोरोनाची लागण झाली आहे. मी त्यांनाही कोकिळाबेन रूग्णालयात दाखल केले आहे. मी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. यादरम्यान मला काहीसी कणकण जाणवली. सौम्य तापही होता. यामुळे मी कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला.
माझी कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह येताच मला रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या ताप नाही. कुठलीही गंभीर लक्षणं नाहीत. ना श्वास घ्यायला त्रास होतोय, ना ऑक्सिजन वा आयसीयू सपोर्टची गरज भासतेय. माझ्या दोन्ही मुली करिना व करिश्मा शिवाय पत्नी बबीता यांच्याही कोरोना टेस्ट केल्या गेल्यात. त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
लहान भाऊ ऋषी कपूर आणि राजीव कपूर यांच्या निधनानंतर रणधीर कपूर यांनी एक मोठा निर्णय घेतल्याचे कळतेय. होय, चेंबूर येथील वडिलोपार्जित घर विकण्याच्या निर्णयापर्यंत ते आले आहेत. याच घरात रणधीर यांचे बालपण गेले. याच घरात ते लहानाचे मोठे झालेत. रणधीर यांचा हा निर्णय अंतिम असल्याचेही कळतेय. राजीव यांच्या निधनानंतर रणधीर एकटे पडले आहेत. त्यांना एकाकी वाटू लागले आहे. अशात आता त्यांना कुटुंबासोबत राहायचे आहे.