कनिका कपूरबाबत बप्पी लहरीने केला मोठा खुलासा, वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 11:21 AM2020-03-24T11:21:44+5:302020-03-24T11:23:00+5:30

कनिकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण या सगळ्यात संगीतकार बप्पी लहरी यांनी एक वेगळाच खुलासा केला आहे.

covid19 kanika kapoor recorded a song for bappi lahiri before came india PSC | कनिका कपूरबाबत बप्पी लहरीने केला मोठा खुलासा, वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

कनिका कपूरबाबत बप्पी लहरीने केला मोठा खुलासा, वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

googlenewsNext
ठळक मुद्देबप्पी लहरी यांनी सांगितले आहे की, कनिकाने लंडनहून परतताना त्यांच्यासोबत एक गाणे रेकॉर्ड केले होते. प्यार में थोडा ट्विस्ट या चित्रपटासाठी तिने गाणे गायले आणि त्यानंतर ती भारतात परतली.

कनिका कपूरला कोरोना व्हायरसची लागण झाली असल्याचे तिनेच सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना सांगितले होते. तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ते रिपोर्ट कनिकाचेच आहेत का असा प्रश्न तिच्या घरातल्यांना पडला होता. कारण या रिपोर्टमध्ये मुलगीऐवजी मुलगा असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे तिची कोरोनाची चाचणी पुन्हा एकदा करण्यात आली. या चाचणीत देखील तिला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण या सगळ्यात संगीतकार बप्पी लहरी यांनी एक वेगळाच खुलासा केला आहे.

बप्पी लहरी यांनी सांगितले आहे की, कनिकाने लंडनहून परतताना त्यांच्यासोबत एक गाणे रेकॉर्ड केले होते. प्यार में थोडा ट्विस्ट या चित्रपटासाठी तिने गाणे गायले आणि त्यानंतर ती भारतात परतली. भारतात आल्यानंतर कनिकासोबत माझा काहीही संपर्क झालेला नाहीये. पण ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी मी प्रार्थना करत आहे. 

कनिकाने इन्स्टाग्रामवर काही दिवसापूर्वी एक पोस्ट लिहिली होती आणि त्यात म्हटले होते की, गेल्या चार दिवसांपासून मला ताप येत असल्याने मी कोरोनाची टेस्ट केली असून ती पॉझिटिव्ह आली आहे. मी आणि माझे कुटुंब सध्या सगळ्यांपासून पूर्णपणे वेगळे राहात असून डॉक्टरांनी दिलेला सल्ला ऐकत आहोत. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांची देखील तपासणी केली जाईल. दहा दिवसांपूर्वी परदेशातून परतल्यावर विमानतळावर माझे स्कॅनिंग करण्यात आले होते. पण त्यावेळी कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. मी घरी येऊन दहा दिवस झाले असून गेल्या चार दिवसांपासून माझ्या शरीरात कोरोनाची लक्षणं जाणवत आहेत.

तिने या पोस्टमध्ये पुढे लिहिले होते की, मी सगळ्यांना विनंती करते की, तुमच्या शरीरात कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळल्यास तुमची टेस्ट करून घ्या आणि सगळ्यांपासून काही दिवस वेगळे राहा.. सुजाण नागरिकाप्रमाणे स्वतःची आणि इतरांची देखील काळजी घ्या... माझी तब्येत आता बरी असून केवळ मला थोडासा ताप आणि सर्दी आहे.

Web Title: covid19 kanika kapoor recorded a song for bappi lahiri before came india PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.