Crazxy Trailer: मुलीचा जीव वाचवण्याऱ्या डॉक्टर बापाची थराराक कहाणी; डोकं चक्रावून टाकणारा ट्रेलर बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 17:20 IST2025-02-17T17:19:04+5:302025-02-17T17:20:24+5:30
'तुंबाड'सारखा अजरामर सिनेमाची निर्मिती करणाऱ्या सोहम शाहच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर भेटीला आलाय (tumbbad, sohum shah)

Crazxy Trailer: मुलीचा जीव वाचवण्याऱ्या डॉक्टर बापाची थराराक कहाणी; डोकं चक्रावून टाकणारा ट्रेलर बघाच
गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडमध्ये एका सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. हा सिनेमा म्हणजे Crazxy. सोहम शाहची प्रमुख भूमिका असलेला Crazxy या सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज झालाय. आज मुंबईत Crazxy सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला. सोहम शाहची (sohum shah) प्रमुख भूमिका असलेला Crazxy सिनेमाचा ट्रेलर लाँच होताच चांगलाच गाजतोय. काय आहे सिनेमाच्या ट्रेलरमध्ये? 'तुंबाड'नंतर Crazxy सिनेमातून सोहम शाह कोणती नवी कथा घेऊन येणार? जाणून घ्या.
Crazxy सिनेमाचा ट्रेलर
सर्जन असलेल्या डॉ. अभिमन्यू सूद (सोहम शाह) याची कहाणी Crazxy सिनेमातून पाहायला मिळते. अभिमन्यूच्या मुलीला किडनॅप केलं जातं. पुढे ज्यांनी मुलीला किडनॅप केलंय ती बदमाश माणसं अभिमन्यूला फोनवर सुचना देऊन त्याला हैराण करतात. त्यानंतर अभिमन्यूजवळ मुलीचं अपहरण करणारी माणसं ५ कोटींची मागणी करतात. मिडल क्लास आयुष्य जगणारा डॉ. अभिमन्यू ५ कोटींचा बंदोबस्त करुन मुलीला वाचवण्यात यशस्वी होईल का, याची कहाणी Crazxy सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतंय. या ट्रेलरमध्ये सोहम शाह प्रमुख भूमिकेत दिसतोय.
Crazxy कधी रिलीज होणार?
सोहम शाह निर्मित Crazxy सिनेमाच्या टीझरने सर्वांची या सिनेमाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन गिरीश कोहली करणार आहेत. सिनेमात सोहम शाह यांची प्रमुख भूमिका दिसणार असून त्यांच्यासोबत कोणते अभिनेते झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. २८ फेब्रुवारी २०२५ ला हा सिनेमा भारतात रिलीज होतोय. 'तुंबाड'नंतर सोहम शाह निर्मित हा सिनेमा कसा असणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.