अनन्याचा सायबर-थ्रिलर येतोय, 'CTRL' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 03:43 PM2024-08-07T15:43:38+5:302024-08-07T15:44:34+5:30

अनन्याने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

CTRL Teaser Out Ananya Pandey Vihaan Samat Upcoming cyber-thrillerWill Release On Netflix On This Date | अनन्याचा सायबर-थ्रिलर येतोय, 'CTRL' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या

अनन्याचा सायबर-थ्रिलर येतोय, 'CTRL' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या

बॉलिवूडमध्ये सर्व प्रकारचे चित्रपट सादर केले जातात. ज्यात अ‍ॅक्शन, थ्रिलर, कॉमेडी, ड्रामा, हॉरर, रोमँटिक आणि सस्पेन्सफुल अशा सगळ्याच चित्रपटांचा समावेश आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या प्रकरच्या चित्रपटांना स्वतःचे असे महत्त्व आहे. काही सस्पेन्सफुल चित्रपट, ज्यांनी शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. अनन्या पांडेचा असाच एक सायबर-थ्रिलर चित्रपट येतोय. जो तुम्हाला शेवट पाहण्यास भाग पाडेल. 

अनन्याने आपल्या नव्या  'CTRL' चित्रपटाची घोषणा केली आहे. अनन्याचा हा चित्रपट सिनेगृहात नव्हे तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. हा फिल्म नेटफ्लिक्सवर पाहता येईल. चित्रपटाचा प्रीमियर ४ ऑक्टोबरला होणार आहे. या चित्रपटात अनन्या पांडे सोबत विहान सामत आणि निखिल द्विवेदी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात अनन्याचा हटके लूक पाहायला मिळत आहे.


विक्रमादित्य मोटवानी हे त्याचे दिग्दर्शन करणार आहेत. या चिलर चित्रपटाचे नाव आहे,अनन्यासमवेत या चित्रपटात विहान सामतही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही निश्चित झाली आहे. अनन्याने चित्रपटाची घोषणा करताना आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओही शेअर केला आहे. अनन्या आणि विहान प्रथमच एकत्र काम करत आहेत. अनन्या आणि विक्रमादित्यही पहिल्यांदाच एकत्र भूमिका करत आहेत. 


वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अनन्या ही वेबसिरीज 'कॉल मी बे'मध्येही दिसणार आहे. 'Call Me Bae' ही सीरिज येत्या 6 सप्टेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रदर्शित केली जाणार आहे. याशिवाय, ती आगामी काळात 'शंकरा' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आर माधवन आणि अक्षय कुमारही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा एक बायोपिक चित्रपट आहे. अनन्या ही सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव यांच्यासमवेत शेवटी 'खो गए हम कहां' या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट गेल्या वर्षी २६ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. 

Web Title: CTRL Teaser Out Ananya Pandey Vihaan Samat Upcoming cyber-thrillerWill Release On Netflix On This Date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.