मी दाऊद इब्राहिमचा आभारी आहे...! राम गोपाल वर्मा पुन्हा बरळले!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 04:09 PM2021-01-25T16:09:23+5:302021-01-25T16:10:07+5:30
आणखी एक नवा वाद
निर्माता आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचे आणि वादाचे जुने नाते आहे, असे म्हणायला हरकत नाही. वादग्रस्त ट्वीट किंवा मग वादग्रस्त विधान यामुळे राम गोपाल वर्मा अनेकदा वाद ओढवून घेतलाय. आता त्यांनी काय करावे तर थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे आभार मानलेत.
होय, राम गोपाल वर्मा यांनी नुकतीच ‘स्पॉटबॉय’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत ते असे काही बरळले की, मोठा वाद निर्माण झाला. सोशल मीडियावर ते ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलेत.
या मुलाखतीचे औचित्य होते, ‘डी कंपनी’ हा आगामी सिनेमा. हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमात पुन्हा एकदा मुंबईच्या एका गँगस्टर्सची कहाणी पहायला मिळणार आहेत. याच सिनेमाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मुलाखत दिली आणि या मुलाखतीत बोलू नयेत ते बोलले.
‘ मी दाऊद इब्राहिमचा आभारी आहे. मी गँगस्टर्सवरचे अनेक सिनेमे बनवून माझे करिअर उभे केले. खरं सांगू तर मला माणसाच्या डार्क साईडमध्ये अधिक इंटरेस्ट आहे,’ असे ते म्हणाले.
राम गोपाल वर्मा यांनी हे विधान त्यांच्या करिअरच्या अनुषंगाने केले असले तरी, त्यांच्या या विधानावर सर्वच स्तरातून टीकेचे स्वर उमटले.
राम गोपाल वर्मा यांच्या ‘डी कंपनी’ या आगामी सिनेमात अभिनेता अक्षत कांत दाऊद इब्राहिमची भूमिका साकारताना दिसणार आहे. 35 वेळा ऑडिशन घेतल्यानंतर त्यांनी अक्षतची या भूमिकेसाठी निवड केली होती.
अनेक सुपरहिट सिनेमे देणारे आणि बहुतांशवेळी सिनेमांपेक्षा वादग्रस्त ट्वीटमुळे चर्चेत राहणारे दिग्दर्शक रामगोपाल वर्मा अलीकडे मुंबई गोव्यात स्थायिक झाले आहे. गोव्यात स्थायिक होण्याचा निर्णय त्यांनी अचानक घेतला नाही तर हा एक विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे. मात्र कामानिमित्त ते मुंबईत येत जात राहणार आहेत.
राम गोपाल वर्मा यांनी सन 1989 मध्ये नागार्जुन स्टारर ‘शिवा’ या चित्रपटातून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. आपल्या अनेक वर्षांच्या करिअरमध्ये सत्या, कंपनी, सरकार यासारखे सुपरहिट सिनेमे त्यांनी दिले आहेत.