सलमान खान या कारणामुळे भडकला दबंग 3 च्या सेटवर, टीमला दिला हा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 12:43 PM2019-08-23T12:43:21+5:302019-08-23T12:45:15+5:30
दबंग 3 या चित्रपटाच्या सेटवर सलमान चांगलाच भडकला होता आणि त्याचे भडकण्यामागचे कारण ऐकून तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसेल.
दबंग या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपटात सलमानने साकारलेली चुलबुल पांडे ही व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांना प्रचंड भावली. या चित्रपटाची सगळीच गाणी चांगलीच गाजली होती. एवढेच नव्हे तर या चित्रपटातील संवाद देखील लोकांच्या तोंडपाठ झाले होते. या चित्रपटातील सोनाक्षी सिन्हा आणि सलमानच्या केमिस्ट्रीची देखील चर्चा झाली होती. दबंग आणि दबंग 2 या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर आता दबंग 3 प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
दबंग 3 या चित्रपटाचे सध्या चित्रीकरण सुरू असून सलमान चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जयपूर येथे आहे. दबंग 3 या चित्रपटाच्या सेटवर सलमान चांगलाच भडकला होता आणि त्याचे भडकण्यामागचे कारण ऐकून तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसेल. सलमनचा दबंग 3 हा चित्रपट 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून हा चित्रपट हिंदीसोबतच कन्नड, तमीळ आणि तेलुगू भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबद्दल सलमानच्या फॅन्सना प्रचंड उत्सुकता असून सलमान त्याच्या फॅन्ससाठी अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. पण असे असूनही चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो लीक होत आहेत. हे फोटो लीक होत असल्याने सध्या सलमान चांगलाच भडकला आहे.
दबंग 3 या चित्रपटातील एक गाण्याचे नुकतेच चित्रीकरण करण्यात आले. हे गाणे सलमान आणि सोनाक्षीवर चित्रीत करण्यात आले. याच गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असल्याने सलमान खूप चिडला होता. सलमानने तात्काळ चित्रपटाच्या टीमची मिटिंग घेतली आणि या पुढे चित्रपटाच्या सेटवरचे कोणतेही फोटो लीक होणार नाहीत याची खबरदारी घ्यायला सांगितले आहे. फोटो लीक होऊ नयेत यासाठी आता सेटवर कुणालाही फोन सुरू ठेवण्याची परवानगी नाहीये. तसेच सेटवरची सुरक्षा अधिक वाढवण्याबाबत सलमानने टीमला सांगितले आहे.
दबंग 3 या चित्रपटाचे पुढील चित्रीकरण आता काहीच दिवसांत पुणे येथे सुरू होणार आहे. पुण्यातील चित्रीकरणादरम्यानचे फोटो लीक होऊ नये यासाठी सेटच्या भिंतीची उंची वाढवण्याचे आदेश सलमानने टीमला दिले आहेत. बाहेरील कोणालाही आत डोकावता येणार नाही याची काळजी घेण्यात सांगण्यात आलेले आहे.