​बाबा, तुम्ही जगातून गेलात... मनातून नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2016 03:19 PM2016-10-12T15:19:23+5:302016-10-17T12:52:05+5:30

शिल्पाने इन्स्टाग्रामवरून आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यासाठी तिने एका कवितेचा आधार घेतलाय. तिने आपल्या वडिलांना जगातील सर्वांत प्रेमळ वडील अशी उपाधी दिली.

Dad, you have gone out of the world ... not from the mind | ​बाबा, तुम्ही जगातून गेलात... मनातून नाही

​बाबा, तुम्ही जगातून गेलात... मनातून नाही

googlenewsNext
ong>अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे वडील सुरेंद्र देजू शेट्टी यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले. घरी हृदयविकाराचा झटका आल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. आज त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी नातलगांसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली. 



शिल्पाने इन्स्टाग्रामवरून आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यासाठी तिने एका कवितेचा आधार घेतलाय. तिने आपल्या वडिलांना जगातील सर्वांत प्रेमळ वडील अशी उपाधी दिली. 
ती म्हणते...
‘‘सुरुवातीपासून जीवनाच्या शेवटपर्यंत तुम्ही आमच्यावर प्रेम करणारे वडील होते. तुम्ही दयाळू होते. मन आणि बुद्धीने तुम्ही गंभीर पण तेवढेच इमानदारही होते. तुम्ही आमच्यासाठी अनेक सुंदर आठवणी मागे सोडून जात आहात. आपल्या कुुटुंबातील एक कडी तुमच्या जाण्याने तुटली आहे. तुम्ही जगातून गेला असलात तरी आमच्या मनात कायम तुमचे स्थान अबाधित राहणार आहे. तुम्ही मनात कायम घर करून असाल. 
बाबा, आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो, तुम्ही जगातील सर्वांत चांगले वडील, चांगले पती, चांगले  मित्र म्हणून वावरलात. इश्वर तुमच्या आत्म्याला शांती देवो. शेट्टी व कुंद्रा कुटुंबाकडून तुम्हाला श्रद्धांजली. 

">http://


शिल्पाच्या या पोस्टवर त्यांच्या निकटवर्ती लोकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. 

शिल्पाचे वडील सुरेंद्र शेट्टी प्रसिद्ध उद्योगपती असून त्यांचा औषध कंपन्यासाठी वॉटरप्रुफ कव्हर बनविण्याचा कारखाना होता. त्यांनी शिल्पा शेट्टीच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी प्रथमच ते टीव्हीवर दिसले होते. 

त्याच्या पार्थिवावर विले पार्ले येथील स्माशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी शिल्पाचे पती राज कुंद्रा, रविना टंडन, अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, लेखक सलीम खान, आर माधवन, हरमन बावेजा, वासू भगनानी, किशन कुमार, अर्पिता खान-शर्मा यांनी स्वांत्वना दिली. 

Web Title: Dad, you have gone out of the world ... not from the mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.