​अनुष्का शर्माला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2018 08:03 AM2018-04-08T08:03:03+5:302018-04-08T13:33:03+5:30

अभिनयासह निर्मिती क्षेत्रात  विशेष योगदान देणारी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. अनुष्काला ...

Dadasaheb Phalke Award for Anushka Sharma | ​अनुष्का शर्माला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

​अनुष्का शर्माला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

googlenewsNext
िनयासह निर्मिती क्षेत्रात  विशेष योगदान देणारी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. अनुष्काला भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाल्याने चाहत्यांमध्ये आनंदाची लकेर उमटली आहे.
  अभिनेत्रीसोबतचं एक यशस्वी निर्माती अशीही अनुष्काची ओळख आहे. तिच्या याच योगदानासाठी अनुष्काला ‘पाथ ब्रेकिंग प्रोड्यूसर’ या नात्याने दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.  अनुष्काच्या प्रॉडक्शन हाऊसने आत्तापर्यंत तीन चित्रपटांची निर्मिती केली आहे. ‘क्लिन स्लेट फिल्म्स’ असे अनुष्काच्या प्रॉडक्शन कंपनीचे नाव आहे. वयाच्या २५ व्या वर्षी अभिनयाच्या यशोशिखरावर असताना अनुष्काने भाऊ कर्नेश शर्मासोबत निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. आत्तापर्यंत अनुष्काने ‘एनएच10’,‘फिल्लौरी’,‘परी’ अशा तीन चित्रपटांची निर्मिती केली. शिवाय यात तिने मुख्य भूमिकाही साकारली. हे तिन्ही चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार कमाल दाखवू शकले नाहीत. पण समीक्षकांनी मात्र या तिन्ही चित्रपटांना चांगली दाद दिली.
सध्या अनुष्का ‘सुई धागा’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात अनुष्का वरूण धवनसोबत दिसणार आहे. याशिवाय शाहरूख खान व कॅटरिना कैफ स्टारर ‘झीरो’ या चित्रपटातही अनुष्का महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. अनुष्का गतवर्षी डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकली. क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत तिने लग्नगाठ बांधली. अर्थात लग्नानंतरही अभिनय आणि निर्मिती क्षेत्रातील तिचे काम तिने थांबवले नाही.

ALSO READ : फोर्ब्सच्या यादीत अनुष्का शर्माचे नाव, आशियातील टॉप ३० मध्ये मिळाले स्थान!

भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाºया कलावंत व तंत्रज्ञांना  दरवर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात येते. सन १९६९ मध्ये दादासाहेब फाळके  यांच्या जन्मशताब्दीवषार्पासून हा पुरस्कार दिला जात आहे.  भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी खात्यातर्फे हा पुरस्कार दिला जातो.  

Web Title: Dadasaheb Phalke Award for Anushka Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.