मानव तस्करीप्रकरणी दलेर मेहंदीला ठोठावली दोन वर्षांची शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 02:26 PM2018-03-16T14:26:45+5:302018-03-16T19:56:45+5:30

पंजाबच्या एका स्थानिक न्यायालयाने प्रसिद्ध गायक दलेर मेहंदीला मानव तस्करी प्रकरणात दोषी ठरवित दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ...

Daler Mehndi sentenced to two years of punishment for human trafficking! | मानव तस्करीप्रकरणी दलेर मेहंदीला ठोठावली दोन वर्षांची शिक्षा!

मानव तस्करीप्रकरणी दलेर मेहंदीला ठोठावली दोन वर्षांची शिक्षा!

googlenewsNext
जाबच्या एका स्थानिक न्यायालयाने प्रसिद्ध गायक दलेर मेहंदीला मानव तस्करी प्रकरणात दोषी ठरवित दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पंजाबमधील पटियाला न्यायालयाने हा निकाल दिला आहे. न्यायालयाने निर्णय देताच पंजाब पोलिसांनी तातडीने दलेर मेहंदीला अटक केली. परंतु काही वेळातच दलेर मेहंदीला दहा हजारांचा जामीन मंजूर केल्याने त्याची सुटका झाली. 

२००३ मध्ये दलेर मेहंदीवर मान तस्करीचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात दलेर व्यतिरिक्त ३१ आरोपी होते. अवैधरीत्या लोकांना परदेशात पाठविणे आणि गुन्हेगारी कट रचल्याचा दलेर मेहंदीवर आरोप होता. तब्बल १५ वर्षांनंतर न्यायालयाने या प्रकरणी निकाल देत दलेरला दोषी ठरवित शिक्षा सुनावली. दरम्यान, याप्रकरणी पहिला गुन्हा २००३ मध्येच अमेरिकेत दाखल करण्यात आला होता. कारण मानव तस्करीद्वारे बºयाचशा लोकांना अमेरिकत पाठविण्यात आले होते. दलेर आणि त्याचा भाऊ शमशेर मेहंदी यांनी तब्बल दहा लोकांना परदेशात ठेवल्याचा पोलीस तपासात उघड झाले होते. 

दलेर मेहंदी आणि त्याचा भाऊ शमशेर आपल्या म्युझिक टीमसोबत लोकांना परदेशात पाठवत आणि त्याबदल्यात मोठी रक्कम वसूल करीत असल्याचा दलेरवर आरोप होता. कारण परदेशात गाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर भारतातून नेलेल्या व्यक्तींना तो तिकडेच सोडून येत असे. २००३ मध्ये जेव्हा पटियाला पोलिसांनी दलेरचा भाऊ शमशेर मेहंदीला अटक केली, त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांना या प्रकरणात अनेक मोठे मासे असल्याचे समजले होते. त्यामध्ये दलेरच्याही नावाचा समावेश होता. 

मेहंदी बंधूंनी १९९८-९९ या एका वर्षाच्या काळात दहा लोकांना परदेशात सोडल्याचा आरोप आहे. दलेर एका अभिनेत्रीसोबत अमेरिका दौºयावर गेला असता, त्यावेळी त्याने तीन मुलींना सॅनफ्रॅन्सिस्कोमध्ये सोडले होते, तर १९९ मध्ये मेहंदी बंधूंनी अमेरिका दौरा केला, त्यावेळी तीन मुलांना न्यू जर्सीमध्ये सोडल्याचा आरोप आहे. बख्शीस सिंह यांनी दोन्ही मेहंदी बंधूंविरोधात त्यावेळी तक्रार दाखल केली होती. आता याबाबतचा निकाल समोर आला असून, त्यात त्यांना शिक्षा ठोठावली आहे.

Web Title: Daler Mehndi sentenced to two years of punishment for human trafficking!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.