Daljeet Kaur Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्री दलजीत कौर यांचं निधन, ब्रेन ट्यूमरशी झुंज अपयशी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 01:30 PM2022-11-18T13:30:28+5:302022-11-18T13:37:24+5:30
Daljeet Kaur Passes Away: पंजाबी अभिनेत्री दलजीत कौर यांचं निधन झालं आहे. त्यांनी अनेक सुपरहिट पंजाबी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
Daljeet Kaur Passes Away: पंजाबी अभिनेत्री दलजीत कौर (Daljeet Kaur) यांचं गुरुवारी पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यात निधन झाले. त्यांनी अनेक सुपरहिट पंजाबी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या असून तिची गणना यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते. दलजीत कौर यांनी वयाच्या ६९ व्या वर्षी सुधर येथील चुलत भावाच्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल पंजाबी चित्रपटसृष्टीतील स्टार्ससह त्यांचे चाहतेही श्रद्धांजली वाहतात.
वयाच्या ६९ व्या वर्षी जगाचा निरोप घेणारी पंजाबी अभिनेत्री दलजीत कौर एका गंभीर आजाराने त्रस्त होत्या. त्यांचा चुलत भाऊ हरिंदर सिंग खंगुराच्या म्हणण्यानुसार, कौर गेल्या तीन वर्षांपासून ब्रेन ट्युमरशी झुंज देत होत्या आणि गेल्या एक वर्षापासून त्या कोमात होत्या.अभिनयाच्या दुनियेसोबतच दलजीत कबड्डी आणि हॉकी खेळाडू होत्या. त्यांच्या निधनावर पंजाबी अभिनेत्री नीरू बाजवा, गायक मिका सिंग यांनी ट्विट करून श्रद्धांजली दिली आहे.
A dear friend and batchmate Daljeet Kaur the punjabi lead girl of yester years passed away on 17th this month. May her soul find eternal peace. 🙏🙏🙏FTII 1976 batch
— satish shah🇮🇳 (@sats45) November 17, 2022
दिल्लीच्या लेडी श्री राम कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कौरने 1976 मध्ये 'दाज' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. दलजीत कौरने 10 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले, तर पंजाबी भाषेतील 70 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. दिलजीत कौरने 'पूत जत्तन दे' (1983), 'मामला गलाल है' (1983), 'की बनू दुनिया दा' (1986), 'पटोला' (1988) आणि 'सईदा जोगन' यासह अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. 1979) यांचा समावेश आहे.