Inside photos: 'दंगल गर्ल'चं स्वप्न उतरलं सत्यात; खरेदी केलं हक्काचं घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 19:45 IST2023-05-05T19:45:00+5:302023-05-05T19:45:00+5:30
Sanya malhotra:सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सान्याने नुकतंच एक नवीन घर खरेदी केलं आहे. या घराचे काही फोटो तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले आहेत.

Inside photos: 'दंगल गर्ल'चं स्वप्न उतरलं सत्यात; खरेदी केलं हक्काचं घर
आमिर खानच्या (amir khan) दंगल या सिनेमातून 2016 मध्ये कलाविश्वात पहिलं पाऊल ठेवणारी अभिनेत्री म्हणजे सान्या मल्होत्रा(Sanya Malhotra). या सिनेमानंतर सान्या रातोरात सुपरस्टार झाली. त्यामुळे ती सातत्याने चर्चेत येत असते. सान्या लवकरत कटहल या आगामी सिनेमात झळकणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमापूर्वीच सान्याचं एक स्वप्न पूर्ण झालं आहे. सान्याने तिचं स्वप्नातील घर खरेदी केलं आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सान्याने नुकतंच एक नवीन घर खरेदी केलं आहे. या घराचे काही फोटो तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले आहेत. सान्याने अलिकडेच या घरात गृहप्रवेश केला असून या पुजेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सान्याने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. या ती कलश पूजन करताना दिसत आहे. 'नवं घर' असं म्हणत तिने हे फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिने परिधान केलेल्या साडीची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत आहे. सान्याने पांढऱ्या रंगाची साडी नेसली असून त्यावर प्रिंटेड ब्लाऊज परिधान केलं आहे.
दरम्यान, सान्याने यापूर्वी २०२१ मध्ये जुहूमध्ये घर खरेदी केलं होतं. या घराची किंमत १४ कोटी रुपये इतकी होती. त्यानंतर आता तिने हे नवीन घर खरेदी केलं आहे.