KGFमधला खतरनाक व्हिलन 'गरुडा' अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी करत होता 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 01:41 PM2022-04-18T13:41:56+5:302022-04-18T13:42:29+5:30

KGF: केजीएफ चित्रपटात खलनायक गरुडाची भूमिका साकारणारा अभिनेता आणि रॉकी म्हणजेच अभिनेता यशमध्ये आहे खास कनेक्शन

Dangerous villain from KGF 'Garuda' was doing 'this' work before making his acting debut | KGFमधला खतरनाक व्हिलन 'गरुडा' अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी करत होता 'हे' काम

KGFमधला खतरनाक व्हिलन 'गरुडा' अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी करत होता 'हे' काम

googlenewsNext

दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा बहुप्रतीक्षित केजीएफ २ (KGF 2) हा चित्रपट १४ एप्रिलला रिलीज झाला. पहिल्याच दिवशी हा चित्रपट सर्वत्र हाउसफुल होता. केजीएफ २ हा १०० कोटींचा बजेट असलेला चित्रपट आहे. १४ तारखेला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १३४.५ करोडचा गल्ला जमवला. दुसऱ्या दिवशी २७५ कोटी आणि तिसऱ्या दिवशी १४५ कोटींचा गल्ला या चित्रपटाने जमवला. केजीएफचा पहिला सीझन २०१८ साली प्रदर्शित झाला होता. त्यामुळे या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत होते. आता या चित्रपटाचा तिसरा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

केजीएफ २मध्ये संजय दत्त(Sanjay Dutt)ने खलनायक अधिराची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचा नायक रॉकी आणि अधिराच्या लढाईची ही कथा रेखाटण्यात आली आहे. आपल्या खाणी परत मिळवण्यासाठी अधिरा रक्तपात करायला धजावत नाही. तिथेच त्याला साथ देणारा त्याचा पुतण्या म्हणजेच सुर्यवर्धनचा मुलगा ‘गरुड’ हा खलनायक सध्या सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळवताना दिसत आहे. त्याला कारणही तसेच खास आहे. चित्रपटाच्या पहिल्या सीझनमध्ये गरूडाच्या भूमिकेला चांगला वाव मिळाला होता. तर दुसऱ्या सीझनमध्येही त्याचा दरारा पाहायला मिळाला. 


गरूडाची भूमिका रामचंद्र राजू (Ramchandra Raju) या कलाकाराने साकारली आहे. रामचंद्र राजू यशच्या जवळचा खास व्यक्ती आहे. चित्रपटात येण्याअगोदर तो यशचा बॉडीगार्ड आणि त्याच्या गाडीचा ड्रायव्हर म्हणून ओळखला जात होता. अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना रामचंद्र राजुने केजीएफ या चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती. त्यात त्याला गरूडची भूमिका साकारण्याची संधी मिळाली.


पहिल्याच चित्रपटामुळे रामचंद्र राजूने प्रेक्षकांच्या मनात घर केले. त्याची भूमिका खलनायकाची जरी असली तरी ती तेवढ्याच ताकदीने त्याने ती निभावली आहे यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक झाले आहे. या चित्रपटानंतर रामचंद्र ‘सुल्तान’, ‘मधगजा’, ‘वेत्री’, ‘जन गन मन’ और ‘बम्पर’ अशा चित्रपटातून काम करताना दिसला. 
 

Web Title: Dangerous villain from KGF 'Garuda' was doing 'this' work before making his acting debut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.