जे ना जमले कुणाला, ते जमले रिंजिंगला! डॅनीच्या मुलाचा होणार धमाकेदार डेब्यू!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 15:09 IST2020-01-24T15:09:13+5:302020-01-24T15:09:37+5:30
बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत अनेक स्टारकिड्सची एन्ट्री होतेय. आता या यादीत बॉलिवूडचा आघाडीचा ‘खलनायक’ डॅनी डेन्जोंग्पाचा मुलगा रिंजिंग याचेही नाव चढले आहे.

जे ना जमले कुणाला, ते जमले रिंजिंगला! डॅनीच्या मुलाचा होणार धमाकेदार डेब्यू!!
बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत अनेक स्टारकिड्सची एन्ट्री होतेय. आता या यादीत बॉलिवूडचा आघाडीचा ‘खलनायक’ डॅनी डेन्जोंग्पाचा मुलगा रिंजिंग याचेही नाव चढले आहे. होय, डॅनीचा मुलगा बॉलिवूडमध्ये एन्ट्रीसाठी सज्ज आहे. इमोशनल अॅक्शन थ्रीलर चित्रपट ‘स्क्वॉड’ मधून रिंजिंगचा डेब्यू होतोय. विशेष म्हणजे रिंजिंगच्या या पहिल्या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन दिसणार आहे. अगदी बॉलिवूडमध्ये यापूर्वी कुठल्याही चित्रपटात न दिसलेले अॅक्शन सीन्स या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
होय, या चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन 400 स्टंट मास्टर्ससोबत शूट केला गेला, यावरून याचा अंदाज येईल. या चित्रपटात एक हेलिकॉप्टर चेजचा सीक्वेन्सही पाहायला मिळेल. अगदी आजवर कुठल्याही बॉलिवूडपटात यापूर्वी असा सीन तुम्ही यात बघात. सूत्रांचे मानाल तर 3 हेलिकॉप्टर्ससोबत केवळ 4 दिवसांत हा सीक्वेन्स शूट केला गेला. हवामान खराब असताना 8 रोलिंग कॅमे-यासोबत दिग्दर्शक निलेश सहाय यांनी हा सीन शूट केला. चिंत्रपटातील सर्व अॅक्शन सीन्स रिंजिंगने स्वत: शूट केलेत. म्हणजेच कुठल्याही बॉडी डबलची मदत न घेता त्याने अॅक्शन स्टंट केलेत.
दिग्गज अभिनेत्री अनीता राज हिची पुतणी मालविका राज या चित्रपटाची हिरोईन असणार आहे. ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात पू उर्फ पूजा शर्मा अर्थात करिना कपूरच्या बालपणीची भूमिका मालविकाने साकारली होती.
‘स्क्वॉड’ची कथा एका लहान मुलीच्या अवती-भवती फिरणारी आहे. ही मुलगी एका कटाची शिकार ठरते, असे याचे ढोबळ कथानक आहे.