डेव्हिड धवन यांच्यावर पार पडली अँजिओप्लास्टी, संपूर्ण कुटुंब करतंय देखभाल; प्रकृतीत सुधारणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 16:05 IST2023-04-13T16:03:49+5:302023-04-13T16:05:02+5:30
डेव्हिड धवन अगदी रेग्युलर डाएट फॉलो करतात. तसेच आपल्या आरोग्याची काळजी घेतात.

डेव्हिड धवन यांच्यावर पार पडली अँजिओप्लास्टी, संपूर्ण कुटुंब करतंय देखभाल; प्रकृतीत सुधारणा
बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन (David Dhawan) यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बरी नव्हती. त्यांना डायबिटिस आहे मात्र आधीपेक्षा त्यांची तब्येत सुधारली आहे. नुकतीच त्यांच्या अँजिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सध्या त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांची काळजी घेत आहे.
डेव्हिड धवन अगदी रेग्युलर डाएट फॉलो करतात. तसेच आपल्या आरोग्याची काळजी घेतात. त्यांची पत्नी लाली धवन, मुलं वरुण आणि रोहित उपचारादरम्यान त्यांच्याजवळ होते. आता डेव्हिड धवन यांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाल्याची बातमी कुठेही कळू दिली नव्हती.
यापूर्वी वरुण धवन 'जुग जुग जिओ' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असताना त्याला समजले की डेव्हिड धवन यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. तेव्हा तो सगळं सोडून रुग्णालयात गेला होता. डायबिटीजमुळे त्यांची तब्येत बिघडली होती. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे.
मनोरंजनविश्वातून सध्या ऐकिवात आलेली ही तिसरी घटना आहे. याआधी मिस यूनिव्हर्स सुष्मिता सेन हिच्यावर सुद्धा नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तसंच शिल्पा शेट्टीच्या आईवरही अँजिओप्लास्टी करण्यात आली.