DDLJ मधली शाहरुची ऑनस्क्रीन ‘मेव्हणी’ आठवते का ?चित्रपटापासून दूर जात या क्षेत्रात कमावतेय नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 12:34 PM2021-12-21T12:34:48+5:302021-12-21T12:37:08+5:30

 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' DDLJ रिलीज झाल्यानंतर बराच काळ तिने कोणत्याही चित्रपटात काम केले नाही. 2015 मध्ये तिचा  X: Past Is Present हा चित्रपट प्रदर्शित झाला होता पण तो सुपरडुपर फ्लॉप ठरला.

DDLJ Shahrukh Khan's Onscreen Sister in law Pooja Ruparel turned 40, Being so gorgeous is not doing films but earning her name in this profession | DDLJ मधली शाहरुची ऑनस्क्रीन ‘मेव्हणी’ आठवते का ?चित्रपटापासून दूर जात या क्षेत्रात कमावतेय नाव

DDLJ मधली शाहरुची ऑनस्क्रीन ‘मेव्हणी’ आठवते का ?चित्रपटापासून दूर जात या क्षेत्रात कमावतेय नाव

googlenewsNext

यश चोप्रा दिग्दर्शित, किंग खान शाहरुख (Shahrukh khan) आणि काजोल(kajol) यांच्या अभिनयाने नटलेल्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या सिनेमाची जादू आजही कायम आहे. 1995 मध्ये आलेल्या या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले. या चित्रपटात काजोलची धाकटी बहीणीची भूमिका बालकलाकार पूजा रुपारेलने (Pooja Ruparel)केली होती. पूजा आता कशी दिसत असावी ? सध्या काय करते ? हे जाणून घेण्याचीही चाहत्यांची उत्सुकता असेलच.  पूजा आता 40 वर्षांची आहे आणि ती खूप ग्लॅमरस दिसते. चित्रपटात मिस राजेश्वरी उर्फ ​​चुटकी म्हणून प्रसिद्धीझोतात आलेली पूजा 1995 पासून इतकी बदलली आहे की फोटो पाहून तिला ओळखणे कठीण झाले आहे.

पूजा रुपेरी पडद्यापासून दूर असली तरी ती बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत तिची चांगलीच मैत्री आहे. अनेकदा बॉलिवूड पार्ट्यांमध्येही ती दिसून येते. सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. तिने तिचे अनेक ग्लॅमरस फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करत असते.पूजाचे बॉलिवूडमध्ये खूप खास कनेक्शन आहे. ती सोनाक्षी सिन्हाची चुलत बहीण आहे.पूजाने बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम केले असले तरी आता ती चित्रपटांपासून दूर आपले खासगी आयुष्य एन्जॉय करत आहे.तसेच स्वतःला बिझी ठेवण्यासाठी ती वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसते.ती  एक गायिका, स्टँडअप कॉमेडियन, स्क्रिप्ट रायटर म्हणूनही काम करते.  पूजाने आयकिडो मार्शल आर्टचे प्रशिक्षणही घेतले आहे. आता ती मुलांना मार्शल आयकिडो आर्ट्सचे व्यावसायिक प्रशिक्षणही देते.

एका मुलाखतीत पूजाने सांगितले होते की, वयाच्या १३व्या वर्षी तिला लग्नाचे प्रपोजल येऊ लागले होते.  'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' रिलीज झाल्यानंतर बराच काळ तिने कोणत्याही चित्रपटात काम केले नाही. 2015 मध्ये तिचा  X: Past Is Present हा चित्रपट प्रदर्शित झाला होता पण तो सुपरडुपर फ्लॉप ठरला.टीव्ही शो 24 व्यतिरिक्त, पूजाने 2016 च्या गुजराती चित्रपट 'पेला आधी अक्षर' मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले होते. तिने एका मुलाखतीत सांगितले की, तिला चित्रपटांमध्ये कधीच रस नव्हता, त्यामुळे आता वेगळ्या इंडस्ट्रीत तिने आपली ओळख निर्माण केली आहे.

Web Title: DDLJ Shahrukh Khan's Onscreen Sister in law Pooja Ruparel turned 40, Being so gorgeous is not doing films but earning her name in this profession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.