महिला ब्यूटी पार्लरमधून तयार होऊन 'या' सुपरस्टारचे सिनेमे थिएटरमध्ये बघायच्या! कोण होता तो?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 10:31 AM2024-07-18T10:31:10+5:302024-07-18T10:33:03+5:30
या सुपरस्टारची क्रेझ इतकी होती की त्याचे सिनेमे पाहण्यासाठी महिलांमध्ये प्रचंड क्रेझ होती
मनोरंजन विश्व हे अनेकांंना भुरळ पाडणारं. सिनेमे पाहण्यासाठी लोक अक्षरशः वेडे असतात. आता ओटीटी माध्यमांमुळे ही क्रेझ काहीशी ओसरली असली तरीही आजही शाहरुख, सलमान, आमिर खानचे सिनेमे पाहण्यासाठी लोक हाऊसफुल्ल गर्दी करतात. इतकंच नव्हे तर दाक्षिणात्य सिनेमे आणि तिकडच्या अभिनेत्यांवर लोक अक्षरशः वेड्यासारखं प्रेम करतात. बॉलिवूडमध्ये असाही एक सुपरस्टार होऊन गेलाय ज्याचे सिनेमे पाहण्यासाठी महिला ब्यूटी पार्लरमधून तयार होऊन थिएटरमध्ये जायच्या. कोण होता तो अभिनेता? त्या अभिनेत्याचं नाव राजेश खन्ना.
राजेश खन्नांसाठी महिलांचा रक्ताने पत्रव्यवहार
आज राजेश खन्नांची पुण्यतिथी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजेश खन्नांचे चाहते त्यांच्यावर अक्षरशः जीव ओवाळून टाकायचे. राजेश दिसायला इतके देखणे होते की, महिलावर्ग त्यांच्यावर फिदा असायचा. असंही सांगण्यात येतं की, राजेश यांचे सिनेमे थिएटरमध्ये पाहण्यासाठी मुली ब्यूटी पार्लरमधून खास तयार होत त्यांचे सिनेमे पाहायला जायच्या. १९७० च्या काळात राजेश यांची इतकी जबरदस्त क्रेझ होती की महिलावर्ग स्वतःच्या रक्ताने त्यांच्याशी पत्रव्यवहार करायच्या. राजेश यांच्या बंगल्यांवर इतकी पत्र यायची की पत्र वाचायला त्यांनी एक माणूस ठेवला होता.
Remembering the greatest Superstar of India, an enigma called #RajeshKhanna 🌹
— Movies N Memories (@BombayBasanti) July 18, 2024
Words are not enough to describe the stardom of this beloved legend
With #SharmilaTagore#Mumtaz#HemaMalini
Your favourite movies of Rajesh Khanna?#superstar#legend#GOAT#bollywoodflashbackpic.twitter.com/9mMonpkTyT
12th death anniversary of #RajeshKhanna, the first #Superstar of Indian cinema.
— Raajaysh Chetwal (@raajaysh) July 18, 2024
वक़्त चलता ही रहता है, रुकता नहीं
एक पल में ये आगे निकल जाता है
आदमी ठीक से देख पाता नहीं
और परदे पे मंज़र बदल जाता है
एक बार चले जाते हैं जो दिन-रात सुबह-शाम
वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते...… pic.twitter.com/93bgsI1VFi
असा घेतला राजेश खन्नांनी जगाचा निरोप
राजेश खन्नांना सर्व प्रेमाने काका म्हणायचे. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत एक जाहिरात केली होती. परंतु ही जाहिरात त्यांना बघता आली नाही. ही जाहिरात शूट केल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी जगाचा निरोप घेतला. १८ जुलै २०१२ ला त्यांचं निधन झालं. पॅकअप हे त्यांचे शेवटचे शब्द होते. राजेश खन्ना यांचे 'आनंद', 'आप की कसम', 'अमर प्रेम', 'कटी पतंग', 'अवतार' असे अनेक सिनेमे प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.