हॉट कपलचा ‘बेफिक्रे’ रोमान्स, लंडनच्या रस्त्यावर रोमॅन्टिक अंदाजात केले एकमेकांना किस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 03:12 PM2020-02-06T15:12:15+5:302020-02-06T15:13:06+5:30
खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों...
गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी हे टीव्हीवरचे बोल्ड कपल मानले जाते. आपल्या बोल्ड फोटोंमुळे हे कपल कायम चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी हे कपल व्हॅकेशनसाठी थायलंडला गेले होते. या व्हॅकेशनमधील त्यांच्या बोल्ड फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. आता हे कपल लंडनमध्ये फिरतेय. त्यांच्या लंडन व्हॅकेशनच्या फोटोंनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
देबिनाने हे फोटो शेअर केले आहेत. यात गुरमीत व देबिना लंडनच्या रस्त्यांवर हातात हात घालून फिरताना दिसत आहेत.
या फोटोतील या हॉट कपलचा रोमान्स पाहण्यासारखा आहे. लंडनच्या रस्त्यावर जगाची पर्वा न करता हे कपल एकमेकांना किस करताना दिसतेय.
तूर्तास या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडतो.
छोट्या पडद्यावर गाजलेल्या ‘रामायण’ या मालिकेत गुरमित चौधरीने प्रभू श्रीरामाची तर त्याची पत्नी देबिनाने सीता मातेची भूमिका साकारली होती.
दोघे रियल लाइफ पती पत्नी या पौराणिक मालिकेच्या निमित्ताने राम-सीता या पौराणिक पती-पत्नीच्या भूमिकेत पाहायला मिळाले होते. या मालिकेच्या सेटवर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले होते.
गुरमीतबद्दल सांगायचे तर मायावी, रामायण, गीत अशा अनेक मालिकांत काम केल्यानंतर तो मोठ्या पडद्याकडे वळला. कोई आप सा या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर खामोशियां, मिस्टर एक्स, वजह तुम हो,लाली की शादी में लड्डू दीवाना, पलटन आदी चित्रपटांत तो दिसला.