लखनौ सेंट्रलच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2017 01:03 PM2017-03-07T13:03:30+5:302017-03-07T18:33:30+5:30
निखील आडवाणीच्या लखनौ सेंट्रलच्या प्रदर्शनाची तारीख १५ सप्टेंबर असणार आहे. निखील आडवाणी यांनी ही तारीख जाहीर केली. आम्ही या ...
न खील आडवाणीच्या लखनौ सेंट्रलच्या प्रदर्शनाची तारीख १५ सप्टेंबर असणार आहे. निखील आडवाणी यांनी ही तारीख जाहीर केली.
आम्ही या प्रकल्पाविषयी खूप उत्सुक आहोत. ही अत्यंत वेगळी गोष्ट असून, जेल आणि त्यांमधील सहकाºयांची पार्श्वभूमी चित्रपटाला लाभली आहे. हा अत्यंत महत्त्वाच्या विषयावर काढण्यात आलेला चित्रपट असून, लोकांसाठी हा नाट्यमय चित्रपट असणार आहे.’ असे निखील आडवाणी यांनी सांगितले.
लखनौ सेंट्रल हा चित्रपट रणजित तिवारी पहिल्यांदाच दिग्दर्शित करणार आहे. यापूर्वी त्याने निखील आडवाणीसोबत डी-डे (२०१३), हीरो (२०१५), कट्टी बट्टी, गुड्डू इंजिनिअर त्याशिवाय दूरचित्रवाणीवरील मालिका पीओडब्ल्यू: बंदी युद्ध के यासाठी सहायक म्हणून काम केले आहे.
या चित्रपटात फरहान अख्तर आणि डायना पेंटी यांच्या भूमिका आहेत. एका छोट्या शहरातून आलेल्या युवकाचे पुढे जेलमध्ये गेल्यानंतर काय होते, या अनुषंगाने हा चित्रपट आहे. गिप्पी ग्रेवाल, दीपक डोबरीयाल, रोनित रॉय, राजेश शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
लखनौ सेंट्रल या चित्रपटाचे सध्या शूटिंग सुरू आहे.