रिसेप्शन वेन्यूवरून समोर आला दीपवीरचा पहिला फोटो, दिसताहेत रॉयल लूकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 08:09 PM2018-11-21T20:09:54+5:302018-11-21T20:10:25+5:30

इटलीतील लेक कोमोमध्ये शाही थाटात लग्न पार पडल्यानंतर दीपिका पादुकोण व रणवीर सिंग पहिले रिसेप्शन देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Deepavir's first photo, which appeared in front of reception venue, looks like a Royal Look | रिसेप्शन वेन्यूवरून समोर आला दीपवीरचा पहिला फोटो, दिसताहेत रॉयल लूकमध्ये

रिसेप्शन वेन्यूवरून समोर आला दीपवीरचा पहिला फोटो, दिसताहेत रॉयल लूकमध्ये

googlenewsNext


इटलीतील लेक कोमोमध्ये शाही थाटात लग्न पार पडल्यानंतर दीपिका पादुकोणरणवीर सिंग पहिले रिसेप्शन देण्यासाठी सज्ज झाले आहेत. लग्नानंतर दीपवीर भारतात तीन रिसेप्शन देणार आहेत. त्यातील आज पहिले रिसेप्शन बंगळुरूतील आलिशान हॉटेल द लीला पॅलेसमध्ये पार पडत आहे. या रिसेप्शनला त्यांच्या जवळचे नातेवाईक व मित्र परिवार उपस्थित राहणार आहेत. दीपिकाचे आई-वडिल हे रिसेप्शन होस्ट करणार आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार आज पार पडणाऱ्या स्वागत समारंभाला दीपिका व रणवीर सब्यासाचीने डिझाईन केलेले कपडे परिधान करणार आहेत. मात्र या रिसेप्शनला दीपिका दक्षिण भारतीय वेशात दिसेल, अशी आशा तिच्या चाहत्यांना आहे. या रिसेप्शनच्या तयारीत कोणतीही कमतरता राहू नये म्हणून स्वतः दीपिकाने लक्ष दिले आहे. या स्वागत समारंभाच्या आयोजनात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. बंगळुरूतील रिसेप्शनमधील दीपिका व रणवीरचा पहिला लूक समोर आला आहे. दीपिका व रणवीरने त्यांचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

हा लूक डिझायनर सब्यसाचीने डिझाईन केला आहे. दीपिकाची साडी तिची आई उज्ज्वला पादुकोण यांनी भेट म्हणून दिली आहे. ही साडी बंगळुरूतील सर्वात मोठ्या दुकानातून घेतली आहे. तर रणवीर सिंगने डिझायनर रोहित बलचे क्रिएशन परिधान केले आहे. 

गत १४ व १५ नोव्हेंबरला इटलीत रणवीर-दीपिका विवाहबद्ध झालेत. दोघांनीही कोंकणी आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीने विवाह केला. यानंतर येत्या २८ नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला मुंबईच्या ग्रण्ड हयात हॉटेलमध्ये दुसरे व तिसरे रिसेप्शन होणार आहे. २८ तारखेच्या रिसेप्शला केवळ मित्र आणि कुटुंबीय असतील. तर १ डिसेंबरचे रिसेप्शन केवळ बॉलिवूडमधील मित्रपरिवारासाठी असेल.

Web Title: Deepavir's first photo, which appeared in front of reception venue, looks like a Royal Look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.