रामायणाचा रिमेक बनवू नका! रणबीरच्या 'रामायणा'वर सीतेचं स्पष्ट मत, दीपिका चिखलिया म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 09:06 AM2024-06-06T09:06:43+5:302024-06-06T09:10:05+5:30

'रामायण' सिनेमाबाबत ऑनस्क्रीन सीता मातेची भूमिका साकारलेल्या दीपिका चिखलिया यांनी भाष्य केलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी रणबीर कपूरच्या रामायणाबाबत त्यांचं मत मांडलं.  

deepika chikhliya said please dont make remake of ramayan talk about adipurush and ranbir kapoor ramayan | रामायणाचा रिमेक बनवू नका! रणबीरच्या 'रामायणा'वर सीतेचं स्पष्ट मत, दीपिका चिखलिया म्हणाल्या...

रामायणाचा रिमेक बनवू नका! रणबीरच्या 'रामायणा'वर सीतेचं स्पष्ट मत, दीपिका चिखलिया म्हणाल्या...

नितेश तिवारींच्या 'रामायण' या बिग बजेट सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. या सिनेमात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीराम तर साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. 'रामायण' सिनेमाबाबत आता ऑनस्क्रीन सीता मातेची भूमिका साकारलेल्या दीपिका चिखलिया यांनी भाष्य केलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी रणबीर कपूरच्या रामायणाबाबत त्यांचं मत मांडलं.  

'रामायण'चा रिमेक बनवला नाही पाहिजे. तसंच धार्मिक ग्रंथांबाबतही चुकीची माहिती सांगितली गेली नाही पाहिजे, असं त्या म्हणाल्या. "मी प्रामाणिकपणे सांगते की जे लोक रामायणवर सिनेमा बनवतात त्यांच्यावर माझी नाराजी आहे. कारण, तुम्ही हे नाही केलं पाहिजे. सारखं सारखं रामायणवर आधारित कलाकृती बनवल्या गेल्या नाही पाहिजेत. कारण, जेव्हा जेव्हा तुम्ही रामायण बनवता तेव्हा प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन कथा, नवीन अँगल, नवीन लूक...काहीतरी वेगळं हवं असतं," असं इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत दीपिका चिखलिया यांनी सांगितलं. 

दीपिका चिखलिया यांनी ओम राऊतच्या 'आदिपुरुष' सिनेमाचं उदाहरण दिलं. त्या म्हणाल्या, "त्यांनी क्रिती सनॉनला गुलाबी रंगाची सॅटिन साडी नेसवली. त्यांनी रावण साकारणाऱ्या सैफलाही वेगळाच लूक दिला. कारण, त्यांना काहीतरी वेगळं आणि क्रिएटिव्ह हवं होतं. पण, यामुळे त्यांनी रामायणचा मूळ उद्देशच घालवला". 

"धार्मिक ग्रंथांचा कोणीही चुकीचा वापर करू नये. त्यामुळे हे करू नका. रामायण व्यतिरिक्त असे खूप विषय आहेत. ज्यावर सिनेमे बनवता येतील. स्वातंत्र्यसैनिकांवर करण्यासारखं खूप काही आहे. पण, फक्त रामायणावरच यांना सिनेमा का बनवायचा आहे?", असंही त्या पुढे म्हणाल्या. 

Web Title: deepika chikhliya said please dont make remake of ramayan talk about adipurush and ranbir kapoor ramayan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.