Video : कपिल शर्माच्या रिसेप्शनमध्ये थिरकत होती दीपिका पादुकोण, त्यानंतर घडले असे काही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 14:24 IST2018-12-25T14:11:22+5:302018-12-25T14:24:45+5:30
गत नोव्हेंबरमध्ये लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर रोज कोणता ना कोणता कारणामुळे चर्चेत असतात. नुकतीच या जोडीन कपिल शर्माच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये हजेरी लावली होती

Video : कपिल शर्माच्या रिसेप्शनमध्ये थिरकत होती दीपिका पादुकोण, त्यानंतर घडले असे काही
गत नोव्हेंबरमध्ये लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर रोज कोणता ना कोणता कारणामुळे चर्चेत असतात. नुकतीच या जोडीन कपिल शर्माच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये हजेरी लावली होती. प्रियांका चोप्राच्या रिसेप्शन पार्टीमध्ये देखील रणवीर आणि दीपिकाने खूप धम्मल मस्ती केली होती. कपिल आणि गिन्नी चतरथच्या रिसेप्शन पार्टीत देखील चर्चा विषय ठरली दीपवीरची जोडी.
या पार्टीत रणवीरच्या गाण्यांवर दीपिका थिरकताना दिसली. रणवीरने दीपिकासाठी गाणं गायले. रणवीरने गाणं गाताच दीपिकाचे पाय ही थिरकायला लागले. सोशल मीडियावर दोघांचेही व्हिडीयो व्हायरल होताना दिसतायेत.
कपिलचे दीपिकावर क्रश असल्याचे त्याने अनेकदा त्याच्या शोमध्ये सांगितले होते. ऐवढेच नाही तर तो दीपिकाला प्रेमाने 'दीपू' अशी हाक मारायचा.
कपिल शर्माने गत 24 डिसेंबरला मुंबईत ग्रँड रिसेप्शन दिले. ज्या रिसेप्शन पार्टीत टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावली.
या रिसेप्शन पार्टीला सोहेल खान, सलीम खान, अनिल कपूर, रेखा, उर्वशी रौतेला, सायना नेहवाल सारख्या अनेकांनी उपस्थिती लावली होती.
कपिल शर्मा लवकरच टीव्हीवर कमबॅक करतोय. पहिल्या एपिसोडचा प्रोमोही रिलीज झाला आहे. ‘द कपिल शर्मा शो सिझन 2’ च्या पहिल्या भागात बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान हजेरी लावणार आहे. त्याचसोबत त्याचे भाऊ सोहेल खान, अरबाज खान आणि वडील सलीम खानही या कार्यक्रमात दिसणार आहेत. याशिवाय या भागात प्रेक्षकांना रणवीर सिंग आणि सारा अली खान यांना देखील पाहायला मिळणार आहेत.