दीपिका पादुकोणचा 15 वर्ष जुना Video व्हायरल; सौंदर्य आणि निरागसता पाहून फिदा झाले चाहते
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 10:24 IST2024-12-23T10:22:38+5:302024-12-23T10:24:10+5:30
सध्या तिच्या एका जुन्या जाहिरातीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

दीपिका पादुकोणचा 15 वर्ष जुना Video व्हायरल; सौंदर्य आणि निरागसता पाहून फिदा झाले चाहते
लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) शाहरुख खानच्या 'ओम शांती ओम' (2007) मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. डेब्यू फिल्मपासून ते आतापर्यंत दीपिकानं हीट सिनेमे दिले आहेत. ती एक ब्लॉकबस्टर अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण, रुपेरी पडद्यावर येण्यापूर्वी दीपिका एक व्यावसायिक मॉडेल होती. तिनं अनेक जाहिरातींमध्ये काम केलं होतं. सध्या तिच्या एका जुन्या जाहिरातीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
दीपिकाच्या सौंदर्याचे असंख्य चाहते आहेत. मात्र, सध्या सोशल मीडियावर तिचा १४ वर्ष आधीचा एका जाहिरातीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दीपिका या व्हिडीओमध्ये चेन्नईस्थित एका कपड्याच्या ब्रँडची जाहिरात करताना दिसतेय. यात तिचे आकर्षक सौंदर्य आणि निरागसता चाहत्यांना पाहायला मिळत आहे. तिच्या गालावरील डिंपल लक्ष वेधून घेत आहेत. तिच्या या व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांनी भरपूर कमेंट्स केल्या आहेत.
दीपिका पादुकोण काही महिन्यांपूर्वीच आई झाली. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ८ सप्टेंबर २०२४ रोजी तिने मुलीला जन्म दिला. तिच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. स्टार कपल रणवीर आणि दीपिका त्यांच्या पालकत्वाचा आनंद घेत आहेत. दीपिका तिच्या लाडक्या लेकीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत आहेत. दीपिकाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती शेवटची 'सिंघम अगेन' मध्ये झळकली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिवसर जबरदस्त कमाई केली. तर त्याआधी ती प्रभास व अमिताभ बच्चन यांच्यासह 'कल्की 2898 एडी' सिनेमात दिसली होती.