वाचा दीपिका पादुकोणने रणवीर सिंगला का म्हटले, कुछ पैसे बच जाएंगे...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 01:38 PM2019-09-10T13:38:51+5:302019-09-10T13:41:22+5:30

दीपिकाने रणवीरच्या एका फोटोवर आपले पैसे वाचतील असे लिहिले असून या कमेंटवरून नेटिझन्सने तिची फिरकी घेतली आहे.

Deepika Padukone advises husband Ranveer Singh how ‘kuch paise bach jayenge’, internet says lol | वाचा दीपिका पादुकोणने रणवीर सिंगला का म्हटले, कुछ पैसे बच जाएंगे...

वाचा दीपिका पादुकोणने रणवीर सिंगला का म्हटले, कुछ पैसे बच जाएंगे...

googlenewsNext
ठळक मुद्देफोटोत रणवीरच्या आजूबाजूला आपल्याला काही स्पीकर आणि म्युझिक सिस्टिम पाहायला मिळत आहेत. या फोटोवर दीपिकाने लिहिले आहे की, यातील काही घरी घेऊन ये ना... आपले पैसे तरी वाचतील...

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग दोघेही सोशल मीडियावर चांगलेच ॲक्टिव्ह असतात. ते वेळात वेळ काढून एकमेकांच्या फोटोंवर सोशल मीडियावर कमेंट करत असतात. आता देखील दीपिकाच्या एका कमेंटने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे आणि ही कमेंट त्यांना प्रचंड आवडत असून त्यांनी त्यावर तिची फिरकी घ्यायला देखील सुरुवात केली आहे.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग आता लग्नानंतर प्रेक्षकांना पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र पाहायला मिळणार आहेत. त्यांच्या 83 या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली असून या चित्रपटात रणवीर कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे तर दीपिका त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. रणवीरने नुकताच इन्स्टाग्रामला एक फोटो शेअर केला आहे. त्याचसोबत त्याने लिहिले आहे की, एका आयकॉनिक साऊंड इनोवॅटरचा ग्लोबल ब्रँड ॲम्बेसेडर झाल्याबद्दल मी खूश आहे. या फोटोत रणवीरच्या आजूबाजूला आपल्याला काही स्पीकर आणि म्युझिक सिस्टिम पाहायला मिळत आहेत. या फोटोवर दीपिकाने लिहिले आहे की, यातील काही घरी घेऊन ये ना... आपले पैसे तरी वाचतील...

दीपिकाच्या या कमेंटवर अनेकांनी हसण्याच्या इमोजी पोस्ट केल्या असून काहीजणांनी कमेंट करत दीपिकाची फिरकी घेतली आहे. एकाने कमेंटमध्ये लिहिले आहेस की, तू एखाद्या गृहिणीसारखी वागत आहेस... तर तू इतक्या पैशांचे काय करणार असा प्रश्न एका नेटिझनने तिला विचारला आहे. 

रणवीरने शेअर केलेल्या एका फोटोत त्याने त्याच्या कानाला हेडफोन लावले असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावर दीपिकाने लिहिले आहे की, मी तुला सतवत असताना तू असाच वागतोस... 

दीपिकाच्या या दोन्ही कमेंटवर आता रणवीर काय रिप्लाय देतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. दीपिका आणि रणवीर हे बॉलिवूडमधील क्यूट कपल असून त्यांचे लग्न गेल्यावर्षी इटलीत झाले. त्यांनी त्यांच्या अगदी जवळच्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या बॉलिवूडमधील मित्रमैत्रिणींसाठी मुंबई आणि बंगलूरू अशा दोन ठिकाणी रिसेप्शन दिले होते. 


 

Web Title: Deepika Padukone advises husband Ranveer Singh how ‘kuch paise bach jayenge’, internet says lol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.